PCMC Election | पिंपरीत फेब्रुवारी अखेरपर्यंत मतदार याद्या तयार करण्याचे आदेश ; आराखड्यावर सूचना व हरकती मागवल्या

प्रभाग रचनेनुसार विधानसभेच्या मतदार याद्या फोडून प्रभागनिहाय 46 याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या वरील मतदार संघांची मूळ मतदार यादी व पुरवणी यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिका मागवून घेणार आहे.

PCMC Election | पिंपरीत फेब्रुवारी  अखेरपर्यंत मतदार याद्या तयार करण्याचे आदेश ; आराखड्यावर सूचना व हरकती मागवल्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 9:18 AM

पिंपरी – आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  (Pimpri-Chinchwad Municipal Corporation)प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसारा आता प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने(State Election Commission) महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. येत्या28 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग निहाय याद्या मतदार(Voter list) तयार करण्यास सांगण्यात आले आहे.मात्र महानगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यामध्ये असलेल्या सुचना व हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना व राजकीय मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ते आपल्या हरकती महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा करू शकतात.

हरकतींवर होणार सुनावणी प्रभाग रचनेच्या आराखड्यावर येत्या 14 फेब्रुवारी दुपारी तीनपर्यंत हरकती व सूचना लेखी स्वरूपात समक्ष स्वीकारण्यात येणार आहेत. त्यावर 26 फेब्रुवारीला सुनावणी होऊन त्याचा अहवाल महापालिका 2 मार्चला आयोगास सादर करणार आहे. त्यानंतर आयोग त्यास अंतिम मंजुरी देणार आहे. त्यांची तारीख आयोगाने प्रसिद्ध केलेली नाही.

मतदाराच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारला जाणार

दरम्यान, आयोगाने प्रभाग रचनेनुसार विधानसभेच्या मतदार याद्या फोडून प्रभागनिहाय 46 याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या वरील मतदार संघांची मूळ मतदार यादी व पुरवणी यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिका मागवून घेणार आहे. त्या याद्यातून प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. मतदार यादीतू वगळण्यात आलेल्या मतदाराच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारला जाणार आहे. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीतील बदलानुसार मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. याद्या बनविण्याचे काम संगणकाद्वारे केले जाणार असून, त्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाऱ्याची नावे 8 फेब्रुवारीपर्यंत कळवणे आवश्यक असणार आहेत.

Chanakya Niti : प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये या 5 गोष्टी नेहमीच कराव्यात, नाहीतर त्यांचे आयुष्य जनावरासारखे होते…

Jio Network Down मुळे वैतागलेल्या ग्राहकांना Reliance चे ‘अमर्याद’ गिफ्ट, किती दिवसांसाठी मोफत डाटा?

Raj Bawa : राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.