Jio Network Down मुळे वैतागलेल्या ग्राहकांना Reliance चे ‘अमर्याद’ गिफ्ट, किती दिवसांसाठी मोफत डाटा?

नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबई सर्कलमध्ये रिलायन्स जियोचे 1.3 कोटी ग्राहक आहेत. युजर्सना दुपारच्या सुमारास नेटवर्क प्रॉब्लेमचा सामना करावा लागला. कंपनीने रात्री 8 नंतर कनेक्शन टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली. मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Jio Network Down मुळे वैतागलेल्या ग्राहकांना Reliance चे 'अमर्याद' गिफ्ट, किती दिवसांसाठी मोफत डाटा?
Reliance Jio ( प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:33 AM

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क शनिवारी जवळपास 8 तास ठप्प होतं. सुरुवातीला आपल्याच भागात रेंज गेल्याचा समज होऊन अनेकांनी आपले मोबाईल रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हळूहळू ट्विटरवर ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या आणि जियो युजर्सना हे व्यापक संकट असल्याची जाणीव झाली. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने ऐन वीकेंडला रिकामेपणाची भावना अनेकांना आली. या काळात अनेक जणांनी जियोला यथेच्छ शिव्यांची लाखोलीही वाहून घेतली. परंतु रिलायन्स जियोने ग्राहकांच्या भावना ओळखून मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत डाटा देण्याची घोषणा रिलायन्स जियोने केली आहे. जियो युजर्सच्या मोबाईलवर कंपनीतर्फे तसा मेसेज पाठवण्यात आला आहे.

काय आहे मेसेज?

प्रिय जियो ग्राहक, तुमच्या सेवेची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आज (शनिवारी) सकाळी, दुर्दैवाने, तुम्हाला आणि मुंबईतील इतर काही ग्राहकांना सेवेत व्यत्यय आल्याचा सामना करावा लागला. आमच्या टीमने या नेटवर्क समस्येचे काही तासांत निराकरण केले, परंतु हा तुमच्यासाठी आनंददायी अनुभव नसावा, अशी आमचा धारणा आहे. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. आम्ही तुमच्या नंबरवर दोन दिवसांचा अमर्यादित डेटा प्लॅन विनामूल्य जारी करत आहोत, जो आज (शनिवारी) रात्रीपासून लागू होईल. तुमच्या वर्तमान योजनेची वैधता संपल्यावर ही विनामूल्य योजना आपोआप सक्रिय होईल. तुमच्या सेवेच्या अनुभवाला सर्वोच्च महत्त्व देण्यास आमचे प्राधान्य आहे. – जियोकडून प्रेम

मुंबईत जियोचे किती युजर्स

नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबई सर्कलमध्ये रिलायन्स जियोचे 1.3 कोटी ग्राहक आहेत. युजर्सना दुपारच्या सुमारास नेटवर्क प्रॉब्लेमचा सामना करावा लागला. कंपनीने रात्री 8 नंतर कनेक्शन टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली. मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात Jio Network Down, तांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.