AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंबड्यांनी अंडी दिली नाहीत, पुण्यातील पोल्ट्री चालकाची पोलिसात तक्रार

ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. | Broiler chicken poultry

कोंबड्यांनी अंडी दिली नाहीत, पुण्यातील पोल्ट्री चालकाची पोलिसात तक्रार
| Updated on: Apr 21, 2021 | 10:39 AM
Share

पुणे: कोंबड्या अंडी देत नसल्यामुळे पुण्यातील एका पोल्ट्री चालकाने (Broiler chicken poultry) खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. सध्या पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असली तरी याप्रकरणाचा तपास नेमका कसा करणार, असा पेच पोलिसांसमोर उभा राहिला आहे. (Broiler chicken poultry farm owner files complaint in Police due to hen not giving egg)

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी सदोष खाद्यामुळे मागील आठ दिवसापासुन अंडी देणे बंद केले आहे. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या पोल्ट्री चालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सगळ्यात आता कारवाई नेमकी कशी करायची, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी 4 एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्या करिता खाद्य घातले होते. ते खाद्य दररोज दिले जात होते. ते खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणे बंद केले आहे, असे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

संबंधित बातम्या:

कोंबडी ‘ताटातून’ पळाली! कोरोना व्हायरसचा चिकन बाजाराला फटका

राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

मटणाचा भाव चिकनच्या दसपट, खवय्यांची मात्र बोकडालाच पसंती

(Broiler chicken poultry farm owner files complaint in Police due to hen not giving egg)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.