AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Kamble: पोलिसाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

Bjp mla sunil kambale | पुणे येथे अजित पवार यांचा शुक्रवारी दौरा सुरु होता. या दौऱ्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी दिसून आली. सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारले. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

Sunil Kamble: पोलिसाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 06, 2024 | 8:39 AM
Share

योगेश बोरसे, पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या दादागिरीचा प्रकार पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा घडला. ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये बातम्या आल्या. विरोधकांनी टीका केली.ं त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भोवले. सुनील कांबळे यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधकांकडून सुरु झालेल्या टीकेनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी शिवाजी सरक असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

काय घडला प्रकार

ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचे नाव कोनशिले नव्हते. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीही वाद घातला. मी स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. मग व्यासपीठावरुन उतरल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या गालात मारले. हा व्हिडिओ ‘टीव्ही ९ मराठी’ने दाखवला.

दरम्यान या प्रकररणात आमदार सुनील कांबळे यांनी स्पष्टीकरण दिले. आपण फक्त त्या व्यक्तीला ढकलले. कोणालाही मारहाण केली नाही. कानाखाली वाजवली नाही. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे. कानाखाली कशी वाजवतात, हे मला चांगलेच माहिती आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?