Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झाला का?, आता ‘दूध का दूध पानी का पानी’…

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर खरंच वेगवेगळे राहत होते का? केवळ मुलीला आयएएस करायचे म्हणून त्यांनी घटस्फोट दाखवला, हे आता चौकशीतून समोर येणार आहे. पूजा खेडकर यांचे वडील शासकीय सेवेत होते.

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झाला का?, आता 'दूध का दूध पानी का पानी'...
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 7:37 AM

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणी कमी होणार नाही. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवून त्यांनी नॉनक्रिमिलेअर गटातून आयएसएस मिळवले. यासंदर्भातील त्यांचा प्रकार समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढणार आहे. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे चौकशीला बोलवले आहे. मसूरीमधील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांचे प्रशिक्षण थांबवले आहे. पूजा खेडकर यांना 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राचे राज्याला आदेश

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नॉनक्रिमिलेअर गटातून आयएएस झाल्या. परंतु खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला का? त्याची चौकशी करण्याचा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सीआयडीला पत्र दिले आहे. परंतु पूजा खेडकर प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असल्यामुळे पुणे पोलिसांना सीआयडीने हे प्रकरण दिले आहे.

आता सर्वच स्पष्ट होणार

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर खरंच वेगवेगळे राहत होते का? केवळ मुलीला आयएएस करायचे म्हणून त्यांनी घटस्फोट दाखवला, हे आता चौकशीतून समोर येणार आहे. पूजा खेडकर यांचे वडील शासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त होते. परंतु कमी उत्पन्न दाखवण्यासाठी घटस्फोट दाखवल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर अहवालही केंद्र शासनाने मागविला असल्याने खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मनोरमा खेडकर यांचा मुक्काम येरवडामध्येच

खेडकर कुटुंबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी पुणे न्यायालयात सुनावली झाली होती. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरमा खेडकरकडून न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र हाच जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे मनोरमा खेडकर यांचा मुक्काम आणखीन काही दिवस येरवडा जेलमध्येच राहणार आहे.

हे ही वाचा

पूजा खेडकर प्रकरण एका ट्विटमुळे उघडले, ते ट्विट करणारा वैभव आहे तरी कोण?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.