AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे घेणार सहा दिवसांचा मेगाब्लॉक, कुठे, कधी, कसा? जाणून घ्या सर्व माहिती

मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्य रेल्वे घेणार सहा दिवसांचा मेगाब्लॉक, कुठे, कधी, कसा? जाणून घ्या सर्व माहिती
| Updated on: Jul 24, 2024 | 12:45 PM
Share

Central Railway Jumbo Mega Block : सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करण्यांचे हाल होणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत.

पुणे विभागातील 19 गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या या सहा दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे विभागातील 19 गाड्या रद्द करण्यात येतील. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलले जातील. यादरम्यान सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. ही ट्रेन 3 दिवस रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

त्यासोबत सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्यासोबतच बंगळुरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका

तसेच नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावणार आहे. मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.