झिका व्हायरसचा रुग्ण आढळलेल्या बेलसरची केंद्रीय पथकाकडून पाहणी, राज्य सरकारच्या उपाययोजनांचा आढावा

पुणे जिल्ह्यातील पुरंदर बेलसर मध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

झिका व्हायरसचा रुग्ण आढळलेल्या बेलसरची  केंद्रीय पथकाकडून पाहणी, राज्य सरकारच्या उपाययोजनांचा आढावा
बेलसर गावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 5:55 PM

पुणे : जिल्ह्यातील पुरंदर बेलसर मध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. हे पथक बेलसर गावची पाहणी केलेला अहवाल केंद्राकडे  पाठवणार आहे.

दोन दिवसांपासून केंद्रीय पथक राज्यात

30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू केल्या होत्या. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपासून केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. त्यांनी दोन दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जावून ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

बेलसरची पाहणी करुन केंद्राला अहवाल देणार

दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी नैन, डॉ. हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

राज्य सरकारच्या प्रयत्नांची माहिती केंद्राला

तीन सदस्य असलेल्या या केंद्रीय पथकाने झिका बाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचा-यांसोबत बैठक केली. झिका व्हायरसने संसर्ग झालेली महिला बेलसर मध्ये पहिल्यांदा आढळल्याने आम्ही या भागाचा दौरा करून राज्य सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या आहेत का या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. यापूर्वी केरळमध्ये झिका वायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. झिका बाहेरच मध्ये आढळलेला रुग्णांमध्ये लक्षणे एक सारखी असून झिका वायरस वाढण्यासाठी मच्छर कारणीभूत आहेत. त्यांना कंट्रोल करणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्थानिक

डॉ. शिल्पी नैन यांनी सांगितले की, गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी ज्यादा विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

इतर बातम्या:

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार

केंद्राचं आरोग्य पथक पुण्याच्या झिकाबाधित गावात, पाहणीनंतर प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत बैठक, केंद्राला अहवाल देणार

Central team visit Belsar village of Purandar Taluka Pune and take review of state government efforts

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.