पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने, विकासासाठी किती पैसे देणारे ते सांगा : चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on 23 villages include in PMC).

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने, विकासासाठी किती पैसे देणारे ते सांगा : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 9:15 PM

पुणे : पुणे महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांना महापालिकेत सामावून घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on 23 villages include in PMC).

“या गावांचा समावेश हा टप्प्याटप्प्याने करावा. तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करुनच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका होती. मात्र गोंधळलेल्या राज्य सरकारने आज घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सरकारने या गावांच्या विकासासाठी किती निधी देणार आणि प्रशासनाच्या मागणीनुसार 9000 कोटींची तरतूद करुन ती या गावातील विकासकामांसाठी पुणे मनपास देणार का? याचा खुलासा करावा”, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil on 23 villages include in PMC).

“कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे महापालिकेचं उत्पन्न घटलं आहे. मनपा हद्दीत या गावांची भर पडल्याने विकासकामांसाठी खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार आहे. या गावातील नागरिकांची मात्र फरफट होईल. हे सरकारने लक्षात घेतले नाही”, अशी टीका त्यांनी केला.

पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेले 23 गावे कोणती?

  1. खडकवासला
  2. किरकटवाडी
  3. कोंढवे धावडे
  4. मांजरी बुद्रूक
  5. नांदेड
  6. न्यू कोपरे
  7. नऱ्हे
  8. पिसोळी
  9. शेवाळवाडी
  10. काळेवाडी
  11. वडाची वाडी
  12. बावधन बुद्रूक
  13. वाघोली
  14. मांगडेवाडी
  15. भिलारेवाडी
  16. गुजर निंबाळकरवाडी
  17. जांभूळवाडी
  18. होळकरवाडी
  19. औताडे हांडेवाडी
  20. सणसनगर
  21. नांदोशी
  22. सूस
  23. म्हाळुंगे

संबंधित बातमी : Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.