AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. (cm uddhav thackeray Inauguration of Incubation & Innovation Center in baramati)

फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला
cm uddhav thackeray
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 1:41 PM
Share

बारामती: दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला

शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं… सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.

किमान विघ्न तर आणू नका

राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच, असा टोला त्यांना नारायण राणे यांना नाव न घेता लगावला.

बारामतीत सगळंच शिकवलं जातं

गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचं केंद्र बनेल, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला. बारामती राजकारणाचं केंद्र आहेच. पण शिक्षणाचंही केंद्र होणार आहे. इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात, असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

संबंधित बातम्या:

‘अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’, रामदास आठवलेंचा सल्ला

तब्बल 14 वर्षांनी होणार आगपेटीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या का वाढवावे लागले दर?

क्रुझ पार्टीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपचा हात, अतुल लोंढे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

(cm uddhav thackeray Inauguration of Incubation & Innovation Center in baramati)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.