AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’, रामदास आठवलेंचा सल्ला

गृहमंत्रीपदाच्या काळात पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांच्यावर कारवाई होत आहे. चौकशीसाठी हजर राहणं आवश्यक होतं. अनेकवेळा ईडीकडून सवलत मिळते, कारवाई होत नाही. ईडीला पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई होते. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई योग्यच आहे, असा दावा आठवले यांनी केलाय.

'अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं', रामदास आठवलेंचा सल्ला
रामदास आठवले, अनिल देशमुख, अजित पवार
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. यावरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचं आठवले म्हणाले. तर अजित पवार यांनी चौकशीला समोरं जाण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. (ED action against Anil Deshmukh is right, Ramdas Athavale’s reaction)

‘देशमुखांवरील कारवाई योग्यच’

अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी 100 कोटी वसुलीबाबत आरोप केले होते. त्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरु होती. चौकशीनंतर आता त्यांना अटक करण्यात आलीय. गृहमंत्रीपदाच्या काळात पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांच्यावर कारवाई होत आहे. चौकशीसाठी हजर राहणं आवश्यक होतं. अनेकवेळा ईडीकडून सवलत मिळते, कारवाई होत नाही. ईडीला पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई होते. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई योग्यच आहे, असा दावा आठवले यांनी केलाय.

‘अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’

तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर अन्याय व्हावा अशी आमची भूमिका नाही. पण ईडीच्या चौकशीत त्यांना काही पुरावे मिळाले आहेत. त्यांनी जी काही नोटीस पाठवली आहे, त्या चौकशीला अजित पवारांनी सामोरं जायला हवं, असा सल्लाही रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिलाय.

अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान अनिल देशमुख ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या :

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, चंद्रकांतदादा म्हणतात, ‘चुकीला माफी नाही!’

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी, परमबीर सिंग बेपत्ता, त्यांना कुणाची साथ? रोहित पवार यांचा सवाल

ED action against Anil Deshmukh is right, Ramdas Athavale’s reaction

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.