PMC |निवडणूक लढवणाऱ्या ईच्छुकांनो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेचा फोटो वापरताय … ; ‘याद राखा’ कारवाई होईल

पुणे महापालिकाही   कोणीही प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या लोगोचा वापर केला तर कारवाई करणार आहे. महापालिकेचे नाव, इमारतीचा फोटो व लोगोचा वापर कोणी वैयक्तिक प्रसिद्धीत केलाही कारवाई केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधानसभेचा लोगो अथवा फोटो कोणालाही वापरता येत नाही.

PMC |निवडणूक लढवणाऱ्या ईच्छुकांनो  स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेचा फोटो  वापरताय ... ;  'याद राखा'  कारवाई होईल
PMCImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 8:10 AM

पुणे- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे( Local body elections) वारे सर्वत्र वाहत आहेत. शहारातील राजकीय वाढलेल्या दिसून येत आहेत . शहरातील आजी-माजी राजकीय पुढाऱ्याकडून नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अनेक ईच्छुक उमेदवारही उमेदवारी मिळावी म्हणून मेहनत घेत आहेत. यासगळ्या गोष्टी करताना अनेकदा प्रसिद्धीसाठी न अनेक इच्छुकांकडून पुणे महानगर पालिकेचा (Pune Municipal Corporation)लोगो तसेच इमारतीचा फोटो वापरला जात आहे. पण या प्रकारे महानगर पालिकेचा लोगो वापरणे भावी नगरसेवकांना (corporators)महागात पडणार आहे. महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात आल्यावर, 15  मार्चपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले. त्यावेळी सर्व विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी माजी झाले आहेत.

प्रशासन उचलणार कारवाईचा बडगा

पुणे महापालिकाही   कोणीही प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या लोगोचा वापर केला तर कारवाई करणार आहे. महापालिकेचे नाव, इमारतीचा फोटो व लोगोचा वापर कोणी वैयक्तिक प्रसिद्धीत केलाही कारवाई केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधानसभेचा लोगो अथवा फोटो कोणालाही वापरता येत नाही. तसेच एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारतीचा लोगो व फोटो कोणीही वापरू शकत नाही; मात्र निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुकांकडून भावी नगरसेवक म्हणून फलकबाजीतून स्वत:ची प्रसिद्धी करताना, महापालिकेच्या इमारतीचा व लोगोचा सर्रास वापर करण्यात येत आहे.

मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न

मतदारांना खूश करताना आयोजित केलेल्या उद्घाटन, लोकार्पण, विविध शिबिरांमध्ये महापालिकेचा लोगो वापरलाजात आहे. महापालिकेच्या नावाचा वापर संबंधितांकडून सोशल मीडियावरही केला जात आहे. महापालिकेच्या लोगोचा व इमारतीचा फोटो असल्यामुळे अनेकांना हा महापालिकेशी संबंधितच कार्यक्रम आहे, असा भ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने नुकतेच आदेश जारी करून असा वापर थांबविण्याचे सांगून, लोगो व फोटोचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचे अनुकरण आता पुणे महापालिकाही करणार असून, लवकरच तसे आदेश जारी होणार आहेत.

IPL 2022 with TV9 : TOP 9 गोष्टी, ज्या पहिल्या Match आधी जाणून घ्यायलाच हव्या! Mankading चा नियमही खास का ठरणार?

Pimpri – Chinchwad| पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेनं घेतला मोठा निर्णय

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी Kirit Somaiya दापोलीत दाखल

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.