AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन दिवसांच्या खंडानंतर पुण्यात आज लसीकरण, पाहा कोणत्या केंद्रावर किती मिळणार लस

पुणे शहरात आज कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. गेले तीन दिवस पुण्यात लसीकरण बंद होतं. आज शहरातल्या 195 केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. पुणे महापालिकेला कोविशिल्ड लसीचे 45 हजार डोस मिळाले आहेत.

तीन दिवसांच्या खंडानंतर पुण्यात आज लसीकरण, पाहा कोणत्या केंद्रावर किती मिळणार लस
कोरोना लसीकरण
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 9:04 AM
Share

पुणे : पुणे शहरात आज कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. गेले तीन दिवस पुण्यात लसीकरण बंद होतं. आज शहरातल्या 195 केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. पुणे महापालिकेला कोविशिल्ड लसीचे 45 हजार डोस मिळाले आहेत. हा साठा केवळ आजच्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे उद्या पुन्हा लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (Corona vaccination will be done in Pune today after three-day break)

कोविशिल्ड लसीचे 45 हजार डोस

केंद्र सरकारकडून पुणे शहरासाठी कोविशिल्ड लसीचे 45 हजार 850 तर कोवॅक्सिनचे 8 हजार 750 डोस पुरवण्यात आले आहेत. 188 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लस तर 7 केंद्रांवर कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना ऑनलाईन बुकींग करून आपला कोविशिल्डचा पहिला डोस बुक करायचा आहे. त्यासाठी 15 टक्के लस ठेवण्यात आली आहे. तर 15 टक्के लस ही थेट लसीकरण केंद्रावर बुक करून दिली जाणार आहे. कोवॅक्सिनसाठीही 15 टक्के डोस हे ऑनलाईन बुकींग करून आणि 15 टक्के डोस हे थेट केंद्रावर बुक करून मिळणार आहेत.

कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी 35 टक्के डोस हे ऑनलाईन पद्धतीने बुक होणार आहेत तर 35 टक्के डोस हे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन मिळणार आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींसाठी हा नियम लागू असणार आहे.

दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही थेट लस

कोविशिल्डचे 188 केंद्रांवर प्रत्येकी 220 डोस दिले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित पाच हजार डोस हे विशेष लसीकरणासाठी वापरले जाणार आहेत. कोवॅक्सिनच्या सात केंद्रांवर प्रत्येकी 500 डोस उपलब्ध केले जाणार आहेत. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही थेट लसीकरण केंद्रांवर बुकींग करून लस दिली जाणार आहे.

… तर उद्या पुन्हा लसीकरण बंद

पुण्यात मागच्या अनेक दिवसांपासून लसींचा तुटवडा आहे. लसींअभावी लसीकरण बंद करण्याची वेळ महापालिकेवर येत आहे. आजही लसींचा पुरवठा झाला नाही तर उद्या पुन्हा लसीकरण बंद करावं लागणार आहे.

तिसऱ्या लाटेचं संकट केरळापर्यंत धडकलेय – अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचं संकट केरळात आलं आहे. केंद्राने आपल्याला काळजी घेण्याचं कळवलं आहे, असे नमूद करीत त्यांनी महाराष्ट्राला नजीकच्या काळात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे संकेत दिलेत. या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला केंद्राने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले. कोरोनामुळे मागील सव्वावर्षात सर्वांनाच महत्वाचे कार्यक्रम घ्यायला मर्यादा आल्या आहेत, असे ते म्हणाले.

इतर बातम्या :

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा निर्णय, ‘श्रीं’च्या दर्शनासाठी करणार ‘ही’ खास सोय

मोठी बातमी, अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा, 17 झोपडपट्यांबाबत पुढच्या आठवड्यात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचं अखेर ठरलं! ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.