AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Coronavirus in Pune | सिरो सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील 10 हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 8207 नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. हे प्रमाण 81.40 टक्के इतके आहे.

पुण्याच्या 'या' भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
कोरोना
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 7:59 AM
Share

पिंपरी-चिंचवड: काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुणे जिल्ह्यातील कोरोना (Coroanvirus) परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात (sero survey) 81 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. (Coronavirus situation in Pimpri Chinchwad)

सिरो सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील 10 हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 8207 नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. हे प्रमाण 81.40 टक्के इतके आहे. गावठाण भागात सर्वाधिक म्हणजेच 84.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. तर 1 हजार 875 नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18.6 टक्के आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाकडून हे सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

कोरोना (Coroanvirus) रुग्णांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे. जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते.

दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 1909 जण बरे होऊन घरी परतले होते. तर 654 जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा गरज पडल्यास हे जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

पुण्यात महानगरपालिका व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देणार

आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

(Coronavirus situation in Pimpri Chinchwad)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.