Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खात्यात फक्त २३९ रुपये, सायबर भामट्यांनी फसवणूक केली २ लाखांची

Pune Crime News : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार पुणे शहरात घडत आहे. उच्च शिक्षित लोकही सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापळत आहे. आता खात्यात २३९ रुपये असताना दोन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय.

खात्यात फक्त २३९ रुपये, सायबर भामट्यांनी फसवणूक केली २ लाखांची
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:14 AM

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. ऑनलाईन फसवणूक करणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांच्या या जाळ्यात उच्च शिक्षित नागरिकही अडकत आहे. पुणे सायबर सेलकडे फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहे. आता तर खात्यात २३९ रुपये असताना आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेची दोन लाखांत फसवणूक झाली आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील २६ वर्षीय महिला एका आयटी कंपनीत काम करते. ती टेली सॉफ्टवेअरवर काम करत असताना सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नसल्यामुळे तिने गुगलवरुन टेली सॉफ्टवेअर कंपनीचा क्रमांक शोधला. त्यावर फोन करुन अडचण सांगितली. समोरच्या व्यक्तीने त्यासाठी दहा रुपये शुल्क लागणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तिच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तिने त्या व्यक्तीला दिला. त्यानंतर तिच्या खात्यातून पाच हजार रुपये डेबिट झाल्याचा फोन आला. त्यामुळे तिने त्या खात्यातील सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात टाकली. तसेच एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर तिच्या खात्यात २३९ रुपये राहिले होते.

त्यानंतर रक्कम गेली

महिलेच्या खात्यातील दुसऱ्या अकाउंटमधूनही पुन्हा रक्कम गेली आहे. तिच्या खात्यातून २५ हजार, ५० हजार डेबिट झाल्याचा मेसेज आला. तिच्या खात्यात तीन लाख पाच हजार रुपये होते. परंतु शिल्लक रक्कम १ लाख १५ हजार राहिली. तिच्या खात्यातून एकूण सात वेळा १ लाख १० हजार ११ रुपये काढण्यात आले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

ओटीपी देऊ नका

गुगलवर सायबर भामट्यांनी अनेक बनावट क्रमांक टाकलेले असतात. यामुळे कंपनीच्या वेबसाईटवर जाऊनच कॉल सेंटरवरील क्रमांक घ्यावा. तसेच कोणालाही आपला ओटीपी देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.