लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टीचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

राजगड येथील केळवडे येथील एका गावात काही तरुण-तरुणांनी डान्स पार्टीचे आयोजन केले होते (Dance party organize in Pune during lockdown)

लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टीचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

पुणे : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, अनेक नागरिक अद्यापही लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीत तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. राजगड येथील केळवडे येथील एका गावात काही तरुण-तरुणांनी डान्स पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या डान्स पार्टीत पैशांची उधळण देखील करण्यात येत होती. तसेच मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली (Dance party organize in Pune during lockdown).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळताच त्यांनी केळवडे गावातील बंगल्यावर छापा टाकला. यावेळी त्यांना बंगल्यात अनेक गोष्टी दिसल्या. विशेष म्हणजे इथे पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता. बंगल्यात रंगीबेरंगी लाईट लावण्यात आले होते. साउंड सिस्टिमचा मोठा आवाज येत होता. तसेच काही तरुणांकडून पैशांची उधळण केली जात असल्याचं पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी तातडीने हा सर्व नंगानाच थांबवला. त्यांनी 13 तरुण-तरुणीला अटक केली. त्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याशिवाय यापुढील तपासही पोलिसांकडून सुरु आहे (Dance party organize in Pune during lockdown).

पुण्यात याआधीही लॉकडाऊनचं उल्लंघन करुन पार्टीचं आयोजन

विशेष म्हणजे पुण्यातील ही पहिला घटना नाही. गेल्या 30 दिवसांपूर्वी म्हणजेच 1 मे रोजी देखील अशीच एक घटना समोर आली होती. त्यावेळी बंगळ्यात सर्रासपणे देहविक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. पुण्यात एका फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनची खिल्ली उडवण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊन असताना तिथे पार्टी आयोजित करण्यात आली. त्यानंतर पार्टीच्या नावाखाली तिथे सर्रासपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. शेजारच्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

समीर ऊर्फ नितेश पायगुडे या इसमाने लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पुण्याजवळ लबडे फार्महाऊसवर सहा तरुणींना फोन करुन बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर काही लोकांना इथे मजा-मस्ती करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.

संबंधित बातमी : भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक