AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी होणार पालखीचं प्रस्थान, दिवे घाट कोणत्या दिवशी बंद राहणार?; पालखी प्रस्थान सोहळ्याची संपूर्ण माहिती…

Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Sohala Schedule : संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. महाराजांच्या या पालखी सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या पालखी सोहळ्याची संपूर्ण माहिती अन् वेळापत्रक... वाचा सविस्तर...

कधी होणार पालखीचं प्रस्थान, दिवे घाट कोणत्या दिवशी बंद राहणार?; पालखी प्रस्थान सोहळ्याची संपूर्ण माहिती...
तुकाराम महाराज पालखीचं आज प्रस्थानImage Credit source: tv9
| Updated on: Jun 28, 2024 | 12:43 PM
Share

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तुकाराम महाराज यांच्या पालखीचा यंदाचा हा 339 वा पालखी सोहळा आहे. या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झाले आहेत. देहूतील विठ्ठल रुखमिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच या पालखी सोहळ्याच्या पूजा आणि इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला.

आज पालखीचं प्रस्थान

स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती झाली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजा करण्यात आली. नंतर तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. काही वेळाआधीतुकाराम महाराज यांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं आहे. आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली आहे. आज दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. तर आज महाराजांची पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी असेल.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत अंदाजे चार ते पाच लाख वारकरी चालणार आहेत. तर 400 दिंड्यांची नोंदणी यावर्षी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याला निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र ते त्यांचा प्रतिनिधी पाठवणार आहेत यंदा पाऊस पाणी बरा झाल्यामुळे वारी सोहळ्यात गर्दी वाढेल.

महाराजांच्या पालखीचं आजचं वेळापत्रक

1) सकाळी पाच वाजता महापूजा

2) सात वाजता नारायण महाराज यांच्या समाधीची विश्वस्तांच्या हस्ते महापूजा

3) सकाळी नऊ ते अकरा संत तुकाराम महाराज यांच्या पादुका चे पूजन

4) दहा ते बारा वाजता काल्याचे कीर्तन

5) दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा

6) पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा

7) सायंकाळी सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्काम

8) रात्री नऊ वाजता किर्तन जागर

श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अश्व पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ चरणी नतमस्तक झाले. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या या अश्वांना मंदिराच्या सभागृहात आणून त्यांचं पूजन करण्यात आलं. यावेळी गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊलीच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमला. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कर्नाटकच्या बेळगावमधील अंकलीतील शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले.

दिवे घाट कोणत्या दिवशी बंद राहणार?

2 जूनला हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार आहेत. या दिवशी दिवेघाट पूर्ण दिवस बंद असणार आहे. महात्मा गांधी स्थानक इथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्यात आली आहे. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी सदर मार्गांची बसवाहतुक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे चालू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर या ठिकाणहून 60 जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.