Pandharpur Wari : पुणे मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज पार करणार दिवे घाट; तर तुकोबाराय महाराजांची पालखी लोणीमार्गे पंढरीकडे ठेवणार प्रस्थान

आळंदी, देहूतील वैष्णवांचा मेळा पुणे मुक्कामानंतर आता पंढरीच्या दिशेन मार्गस्थ झाला आहे. याच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.

Pandharpur Wari : पुणे मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज पार करणार दिवे घाट; तर तुकोबाराय महाराजांची पालखी लोणीमार्गे पंढरीकडे ठेवणार प्रस्थान
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:20 AM

पुणे : पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे (Palkhi) आता पुढील मार्गासाठी प्रस्थान झाले आहे. आज सकाळी पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान झाले असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर मार्ग दिवे घाट (Dive Ghat) सर करून सासवड येथे मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसरमार्गे मांजरी करत लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे मुक्कामी असणार आहे. दोन वर्षानंतर पायी वारी सोहळा सुरू झाल्यानंतर लाखो वारकरी दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी झालेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवे घाटातील अवघड वाट सर करणार आहे. तर दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी लोणीमार्गे पंढरीकडे प्रस्थान करीत आहे.

वारीत चोरी करणारे जेरबंद

दोन दिवस पुणे मुक्कामी असलेल्या पालख्यांनी पुणे गजबजले होते. आळंदी, देहूतील वैष्णवांचा मेळा पुणे मुक्कामानंतर आता पंढरीच्या दिशेन मार्गस्थ झाला आहे. याच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे. पालखी सोहळाला मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झालेले असताना याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक भुरट्या चोरट्यांनी सोनसाखळी, पाकिटावर डल्ला मारला आहे. या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांची पथक नेमण्यात आली. त्यामध्ये काही पोलीस अधिकारी, कर्मचारी हे वारकरी वेशभूषा करून

हे सुद्धा वाचा

वारीमध्ये गस्त घालत होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी विविध पथके, कर्मचारी आणि अधिकारी गस्त घालत होते. सीसीटीव्हीदेखील अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी गस्त घालत असताना अनेक संशयित त्यांच्या नजरेस पडले. जवळपास 225 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 60 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पालखी सोहळ्यातील गुन्हेगारांना ओळखण्यासाठी काही व्यक्तींना त्या-त्या जिल्ह्यातून आणले होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.