AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वाईट वाटतंय, अजित दादांकडून खदखद व्यक्त, पाहा काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या गटाला एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. मात्र आता संपूर्ण तयारीने अजितदादा विधानसभेच्या तयारीला लागले आहे. पुण्यातील आंबेगाव येथील सभेत त्यांनी आपली खदखद व्यक्त करून दाखवत मतदारांना भावनिक साद घातली.

लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वाईट वाटतंय, अजित दादांकडून खदखद व्यक्त, पाहा काय म्हणाले?
| Updated on: Aug 18, 2024 | 6:45 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. लोकसभेमध्ये अजित पवार गटाची एकच जागी आली होती. इतर जागांवर त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे विधानसभेआधी अजितदादा आपली संपूर्ण ताकद लावताना दिसत आहे. पुण्यातील आंबेगाव येथील सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी लोकसभेला झालेल्या पराभवाची खदखद व्यक्त केली. त्यासोबतच झालेल्या चुकांची माफीसुद्धा मागितली.

अजित पवार काय म्हणाले?

लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वाईट वाटतंय. बेंबीच्या देठापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली. अशी खंत वजा साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली. आता तुमच्या कांदा, टोमॅटो वर कधीचं निर्यात बंदी आणणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलं आहे. आता आम्ही सत्तेत असल्यानं हे झालं. तुमचा खासदार अमोल कोल्हेला हे सांगितलं तर ते काय म्हणणार? मी तर सत्तेत नाही. तेच जर तुम्ही शिवाजी आढळरावांना निवडून दिलं असतं तर? असं म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केली.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणलेली आहे आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही. एकदम कोणी उठत आणि नेता व्हायला लागतं हे येड्या गाबळ्याचे काम नाही त्यासाठी 20 ते 25 वर्षे घासायला लागतात, असं म्हणत अजित पवारांनी देवदत्त निकम यांना नाव न घेता टोला लगावला.

काहीजण बोलतात ही योजना बंद होईल. आम्ही काम करणारी माणसे आहोत. मागच्या वेळेस एकदा वीज माफी केली होती त्यावेळी निवडणुका झाल्या आणि मला सांगितलं गेलं आता निवडणुका झाल्या योजना बंद. आता लोकसभे सारखा दणका दिला तर या योजना बंद आणि तुम्ही महायुतीला साथ दिली तर योजना सुरू राहणार, असंही अजित पवार म्हणाले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.