Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसबा पोटनिवडणुकीत कित्येक वर्षांनी भाजपचा पराभव, अमृता फडणवीस यांची अवघ्या एका वाक्यात प्रतिक्रिया

भाजपच्या कसब्यातील पराभवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याता आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात आपली भूमिका मांडली.

कसबा पोटनिवडणुकीत कित्येक वर्षांनी भाजपचा पराभव, अमृता फडणवीस यांची अवघ्या एका वाक्यात प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 12:04 AM

मुंबई : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारलीय. या निवडणुकीत तब्बल 28 वर्षांनी भाजपचा पराभव झालाय. कसबा विधानसभेची जागा ही भाजपची पारंपरिक जागा किंवा बालेकिल्ला मानला जात होता. पण याच बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला धूळ चारली आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला देखील नव्याने उभारी मिळाली आहे. 28 वर्षांपूर्वीची जागा भाजपच्या हातून जाऊ शकते तर काहीही होऊ शकतं, असं मत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मांडलं जातंय. दरम्यान, भाजपच्या कसब्यातील पराभवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याता आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात आपली भूमिका मांडली.

अमृता फडणवीस या नेहमी राज्य आणि देशातील विविध घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. शिवसेनेसोबत भाजपची युती तुटल्यानंतर त्यांनी अनेकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला होता. याशिवाय राज्याच्या विविध राजकीय घडामोडींवर त्या नेहमी प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी तीन शब्दांत उत्तर दिलं. खरंतर अमृता फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावर जास्त बोलणं टाळलं आहे. “जे झालंय ते आपण पाहिलेलं आहे”, असं एका वाक्यात अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे भाजपच्या पराभवावर त्या नाराज आहेत हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांनी फार काही बोलणं टाळलं.

कसब्यात फडणवीस-शिंदे जोडीच्या विरोधात महाविकास आघाडी सरस

भाजपनं 28 वर्षांपासूनचा कसबा बालेकिल्ला गमावला आहे. 28 वर्षांनंतर भाजपच्या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसनं एंट्री केली आहे. भाजप-शिंदेंच्या शिवसेना युतीच्या विरोधात कसब्यात मतदान झालं. फडणवीस-शिंदे जोडीच्या विरोधात महाविकास आघाडी सरस ठरली. 2019मध्ये भाजपचा 28 हजारांनी विजय पण साडे 3 वर्षात 11 हजारांनी पराभव झाला. टिळक कुटुंबात तिकीट न दिल्यानं ब्राह्मण समाजाची नाराजी उमटलीय.

काँग्रेसच्या धंगेकरांच्या बाजूनं महाविकास आघाडी ताकदीनं लढली. गांधीजी आणि नोटा संदर्भातल्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचाही फटका बसला. नगरसेवक धंगेकरांची स्थानिक लोकप्रियता भाजपच्या प्रचारावर भारी पडली. त्यामुळे कसब्यातल्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिंकले.

कसब्यातला पराभव हा भाजपला मोठा धक्का आहे. सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होती. त्यातच चिंचवडमध्ये भाजपला विजय मिळाला असला तरी बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपला पराभव झाला. साडे 3 वर्षातच, कसब्यातला मतदार काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूनं उभा राहिला.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.