AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune World Cup 2023 | पुणे सामन्याचे तिकीट मिळत नाहीत… सोशल मीडियावर प्रतिक्रिया..अखेर रोहित पवार म्हणाले…

Pune World Cup 2023 match | पुणे शहरात अनेक वर्षांच्या खंडानंतर विश्वचषकाचे सामने होत आहे. यामुळे पुणेकरांचा उत्साह जोरात आहे. पुणे येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यांसाठी तिकीट बुकींग सुरु झाले आहे. पण तिकीट मिळत नाही.

Pune World Cup 2023 | पुणे सामन्याचे तिकीट मिळत नाहीत... सोशल मीडियावर प्रतिक्रिया..अखेर रोहित पवार म्हणाले...
pune cricket stadiumImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 12, 2023 | 3:15 PM
Share

पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : जागतिक क्रिकेट करंडक स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पुणे शहरात तब्बल 27 वर्षांनी क्रिकेटचे सामने होत आहे. यामुळे हे सामने पाहण्यासाठी अनेक पुणेकरांनी आणि क्रिकेटप्रेमींनी तयार केली आहे. पुण्यात 19, 30 ऑक्टोबर, 1, 8 आणि 11 नोव्हेंबर रोजी सामने होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी बुकींग सुरु झाली आहे. परंतु अनेकांना तिकीट मिळत नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहे.

तिकीट बुकींग सुरु

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. पहिले दोन सामने भारताने जिंकले आहे. आता भारताचा तिसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताचे सामने पाहण्यासाठी नाही मिळाले तरी आपल्या शहरात किंवा परिसरात होणारा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी तयारी केली आहे. क्रिकेटप्रेमी ऑनलाईन तिकीट बुकींग करत आहेत. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवरही होणाऱ्या पाच सामन्यांसाठी तिकिटींची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे.

बुकींग सुरु अ्न अडचणी वाढल्या…

१९, ३० ऑक्टोबर, १, ८ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्याचे तिकीट बुकींग सुरु झाले आहे. परंतु तिकीट बुक करताना अडचणी येत आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. तसेच काही जणांना एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली.

काय म्हणाले रोहित पवार

रोहित पवार यांनी तक्रारीची दाखल घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यावर म्हटले आहे की, तिकिटांचे बुकींग हा विषय आयसीसीच्या अखत्यारीत आहे. त्यामध्ये एमसीएचा काहीही संबंध नाही. परंतु मी संबंधित विषयात लक्ष घातले आहे. यासंदर्भातील मेसेज योग्य ठिकाणी पाठवला आहे. रोहित पवार यांच्या टि्वटरला अनेकांनी उत्तर देत आयसीसीच्या कारभारवर प्रश्न उपस्थित केले आहे.

पुणेकरांना मिळणार स्टेडियमपर्यंत बस

गहुंजे स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी पुणेकरांसाठी बसची सोय केली आहे. पुणे मनपा भवन येथून सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेत बस सुटणार आहेत. तसेच कात्रजवरुन सकाळी ११ आणि ११.३० वाजता बस सुटणार आहे. निगडीवरुन दुपारी १२ आणि साडेबारा वाजता बस सोडण्यात येणार आहे. डे-नाईट सामन्यासाठी या तिघ ठिकाणांवरुन बस सोडण्यात येणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.