पुण्यातून मोठी बातमी, भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी, बड्या नेत्यांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खडकवासला मतदारसंघाबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा सगळा प्रकार झाला.

पुण्यातून मोठी बातमी, भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी, बड्या नेत्यांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती
पुण्यातून मोठी बातमी, भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 4:53 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून काही प्रमुख नेत्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक त्या त्या मतदारसंघात जावून आढावा घेत आहेत. पण या निरीक्षकांनादेखील आता अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण काही मतदारसंघांमध्ये भाजप पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. यावरुन पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद समोर येत आहे. पुण्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे निरीक्षकांसमोरच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

संबंधित घटना ही पुण्यात घडली आहे. पुण्यात खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक प्रसन्न जगताप आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात ही खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भाजप नेत्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत आहे. अमित शाह यांनी नुकतंच आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापसात कोणताही वाद, मतभेद न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. असं असताना खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत राडा झाला.

नेमकं काय घडलं?

खडकवासला मतदारसंघात भाजप बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप आणि भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. या बैठकीत भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांना बोलू न दिल्याने बैठकीत नाराजी होती. या बैठकीत इच्छुक उमेदवारांचं गुप्त मतदान होतं, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण यावेळी भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर खडकवासला मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीवरून दोन गट आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

भाजप नेत्याची प्रतिक्रिया

“काल आमच्या खडकवासला मतदारसंघाची बैठक होती. मला सकाळी अकरा वाजता मेसेज आला. फोन वगैरे आला नाही. मी इच्छुक आहे, त्यामुळे शक्यतो फोन येत नाहीय. फक्त मेसेजच येत आहे. या कार्यक्रमात सुरुवातीला आमच्या भागातील नेतेमंडळी बोलून गेले. त्यानंतर पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक बोलणार होते की, मला दोन मिनिटं बोलू द्या. मी इच्छुक आहे ते सांगू द्या. पण स्थानिकांनी माझा आवाज दाबला”, अशी प्रतिक्रिया एका इच्छुक भाजप नेत्याने दिली.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....