AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचा वाद, भाजपचे दोन नेते पुन्हा आमने-सामने, काय आहे कारण?

 छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामासाठी आवश्यक तरतूद यापूर्वीच केली गेली होती. त्यामुळे येथे आणखी निधीसाठी वर्गीकरणाची गरज नाही. तरीही यासंदर्भात सर्व माहिती घेऊन, गरज भासल्यास वर्गीकरण मंजूर केले जाईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचा वाद, भाजपचे दोन नेते पुन्हा आमने-सामने, काय आहे कारण?
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 7:30 AM
Share

प्राजक्ता ढेकळे ,  पुणे – पुणे महानगरपालिकेत (Pune municipal corporation)  भाजपची सत्ता आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये (Bjp leader) असलेल्या वाद अनेकदा चव्हाट्यावर येताना दिसतात. अश्यातच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak)व स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतरासने यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलं आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असूनही कामे स्थायी समितीकडून अडवली जात असल्याचा थेट आरोप आमदार मुक्ता टिळक यांनी केला आहे. स्थायी समिती अध्यक्षांना शिवाजी रस्त्याच्या कामाचे दोन कोटींचे वर्गीकरण मंजूर करावे असे सांगूनसुध्दा, प्रस्ताव दोन महिने पुढे घेण्यात आला असल्याचा आरोप आमदार मुक्ता टिळक यांनी केला.याबाबत मुक्ता टिळक यांनी प्रसिद्धि केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन व स्थायी समितीकडून   तक्ररींची दाखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे वाद

शहारातील शिवाजी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठीचा ”स’ यादीतून दिलेला एक कोटी रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने थेट दोन महिने पुढे ढकलला. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बाजीराव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती.  परंतु रस्त्याची रुंदी कमी असल्याने तांत्रिकदृष्ट्या उड्डाणपूल उभारणे शक्य नसल्याने, यापैकी १ कोटी रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वर्गीकरण करून देण्याचा प्रस्ताव आमदार टिळक यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रशासनाला दिला होता; पण प्रशासनाने निधीची गरज नाही असे सांगितले. असे असताना पुन्हा निधी वर्गीकरण करून मिळावा, अशी मागणी प्रशासनाने केली. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याशी वर्गीकरणाबाबत चर्चा करून तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. परंतु स्थायी समितीने वर्गीकरण करण्यास नकार देऊन प्रस्ताव दोन महिने पुढे घेतला असल्याचे टिळक यांनी सांगितले आहे

आवश्यकता भासल्यास मंजूर करू छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामासाठी आवश्यक तरतूद यापूर्वीच केली गेली होती. त्यामुळे येथे आणखी निधीसाठी वर्गीकरणाची गरज नाही. तरीही यासंदर्भात सर्व माहिती घेऊन, गरज भासल्यास वर्गीकरण मंजूर केले जाईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.  तर दुसरीकडे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्थायी समितीने हेवेदावे त्वरित मिटवावे व हा रस्ता दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मला कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादनको असे मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे.

TET परीक्षेतला घोटाळा BJPच्या काळातला, Varsha Gaikwad यांची टीका

Gondia Nagar Panchayat | देवरी, सडक अर्जुनी नगरपंचायतीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव; तर मोरगाव अर्जुनीमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण कुणाला?

ह्योच नवरा पाहिजे, 5000 तरुणीचं एका तरुणाला लग्नाचं प्रपोज; काय आहे भानगड वाचा!

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.