अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर;अविनाश पाटील यांनी काय केले आहेत आरोप?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर;अविनाश पाटील यांनी काय केले आहेत आरोप?
Anti-Superstition Committee
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 2:03 PM

 प्राजक्ता ढेकळे, पुणे- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर(Narendra dabholkar) यांच्या मृत्यूनंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीमधला (Anti-Superstition Committe ) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.जेष्ठ नेते एन.डी.पाटील हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता यांच्या गटाने या ट्रस्टवर एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील (Saroj Patil)याची निवड केली. मात्र अविनाश पाटील(Avinash Patil )गटाने आक्षेप घेतला आहे. तब्बल 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.

मुक्ता व हमीद दाभोलकर गटाकडून फसवणूक

या गटाचा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही सदर गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४/६ महिन्यातून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच माननीय सरोजताई पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून सदर गटाने निवड जाहीर करणे आहे. समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे.

घराणेशाहीमुळे पुरोगामी चळवळीचे नुकसान वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील यांची, म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून‌ सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते‌ मृत्यु पर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत आदरणीय भाई एन डी पाटील सर हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते. एका बाजूला डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची वेदना मनात असताना, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते उमेदीने काम करत होते. खुनानंतरच्या आठ वर्षात लोकशाही, विकेंद्रित कार्य पद्धती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे समितीचे काम दुप्पट वाढले, व्यापक अंगाने विस्तारले‌ आहे. अंधश्रद्धा निर्मूलन‌ एके‌ अंधश्रद्धा निर्मूलन‌ या मर्यादेत न राहता समाजातील व्यापक परिवर्तनाशी जोडुन घेण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाची‌ दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

सात कोटींचा ट्रस्ट घेतला ताब्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. .

वैयक्तिक आकसाच्यापोटी हे आरोप  अविनाश पाटील यांनी मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांच्यावरील आरोप अंनिसनं फेटाळले आहेत. अविनाश पाटील यांना अंनिसमधून पदमुक्त करण्यात आलंय,त्यांचा आणि अंनिसचा कोणताही संबंध नाही.अविनाश पाटील यांनी वैयक्तिक आकसाच्यापोटी हे आरोप केले आहेत. गेल्यावर्षी त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अंनिसचा एक रुपयाही ट्रस्टीनी घेतलेला नाही असे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि सचिव दीपक गिरमे यांनी दिलं आहे.

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!

‘मला तुझ्याबद्दल….’, जयदेव उनाडकटने जाहीर केला अश्विनने पाठवलेला खासगी मेसेज, काय होत त्यात?

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.