Anna Hazare: मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं का? आण्णा हजारेंच्या सवाल

राज्य लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याच समाधान आहे. लोकपाल लागू झाल्यावर एक वर्षात लोकायुक्त कायदा करायचा असा नियम होता. खूप चांगला मसुदा तयार झालाय, मी समाधानी आहे.

Anna Hazare: मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं का? आण्णा हजारेंच्या सवाल
Anna Hazare
Image Credit source: Tv9
अश्विनी सातव डोके

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jun 03, 2022 | 3:17 PM

पुणे- मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं का? तरुणांनी आंदोलन उभं केलं पाहिजे. केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढली आहे. एवढी महागाई आत्तापर्यंत वाढली नव्हती. अशी टीका जेष्ठ समाजसुधारक आण्णा हजारे ( Anna Hazare)यांनी केली आहे . राज्य लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याच समाधान आहे. लोकपाल (Lokpal)लागू झाल्यावर एक वर्षात लोकायुक्त कायदा करायचा असा नियम होता. खूप चांगला मसुदा तयार झालाय, मी समाधानी आहे. हा मसुदा तयार व्हायला खूप उशीर झाला तरी विधानसभेत लवकरच याच कायद्यात रूपांतर होईल ही अपेक्षा आहे. असे मत जेष्ठ समाजसुधारक (Social Worker)आण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी महागाईच्या मुद्द्यावरून अण्णांना प्रश्न विचारण्यात त्यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केलं. काही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत लोकायुक्त कायदा मसुदा समितीची बैठक पुण्यातील यशदा संस्थेत पार पडली त्यानंतरमाध्यम प्रतिनिधींसोबत ते बोलत होते.

अन्यथा सरकारमधून चालते व्हा

काही दिवसांपूर्वी लोकायुक्त कायदा तयार कामातील दिरंगाई तसेच याबाबत कोणत्याही पद्धतीची बैठका झाली नसल्याने तातडीने बैठक घावी असेपत्र राज्यसरकार यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर सरकारने ही बैठक बोलवली होती. अण्णांनी आपल्या पत्रात एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे आता आमचे आंदोलन असेल. राज्यात जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील 35 जिल्हे आणि कमीत कमी 200 तालुक्यांमध्ये काम सुरू झाले. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी हे आंदोलन उभे केले जाणार आहे. आता लोकायुक्त कायदा झालाच पाहिजे, होणार नसले तर या सरकारने पायउतार व्हावे, अशी आमची मागणी आहे. गरज पडल्यास यासाठी पुन्हा उपोषण करण्याची आपली तयारी आहे. मात्र, 85  वर्षांच्या वयात उपोषण होणार नाही हीच इच्छा, असे लिहिले होते. आज पार पडलेल्या बैठकीला अण्णा हजारे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें