AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुण्यातील मंदिरात ड्रेस कोड लागू, या कपड्यांना असणार बंदी

Pune News : मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड असणार आहे. पुणे उपनगरातील मंदिर ट्रस्टने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांनी अन् भाविकांनी केले आहे.

Pune  : पुण्यातील मंदिरात ड्रेस कोड लागू, या कपड्यांना असणार बंदी
हिंदू घर्मात घंटीचे महत्त्वImage Credit source: Social Media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 27, 2023 | 12:27 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी नियमावली तयार केली होती. मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू केला होता. परंतु त्यानंतर मंदिर संस्थानने यु टर्न घेत सात तासांत निर्णय फिरवला. तुळजापुरात हा निर्णय अयशस्वी झाला असला तरी पुण्यात ड्रेस कोडचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे शहरातील वाघेश्वर मंदिरासाठी ड्रेस कोडचा नियम केला गेला आहे. शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कशावर असणार निर्बंध

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदीर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सातव व उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय यांनी घेतला आहे.

पुरुषांना देखील असणार नियम

मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचे फलक लावण्यात आले आहे. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर देवस्थान ट्रस्टकडून नियमावली जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी व भाविकांनी केले.

या ठिकाणी आहेत नियम

  • मध्य प्रदेशातील गुना येथील जैन मंदिरात प्रवेशाचा नियम आहे. येथे पाश्चात्य कपडे परिधान करून कोणतीही महिला किंवा मुलगी प्रवेश करू शकत नाही. या मंदिराचे मूळ नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे, जे १२३६ मध्ये बांधले गेले.
  • माँ कामाख्याचे मंदिरामध्ये ड्रेस कोडचा नियम आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात मातेच्या पूजेसाठी कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही, परंतु मंदिराच्या आवारात एक शिळा आहे ज्याची पूजा केली जाते. त्या ळेला काळभैरव असे म्हणतात.
  • केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूची पहिली मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की महिला येथे विष्णूची पूजा करू शकतात परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. महिलांसोबतच येथील पुरुषांनाही भारतीय ड्रेसमध्ये मंदिरात जावे लागते.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर