AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे येथील वीज चोरांना ‘जोरका झटका’, लाखांनी केली वीज चोरी, आता दंड होणार कोट्यवधी

पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरातील अनेक भागात तपासणी मोहीम सुरु करण्यात आली.

पुणे येथील वीज चोरांना 'जोरका झटका', लाखांनी केली वीज चोरी, आता दंड होणार कोट्यवधी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 21, 2023 | 12:30 PM
Share

पुणे : वीज चोरी करणे किती महाग पडू शकते, हे पुण्यातील एका बातमीने सिद्ध होत आहे. पुण्यातील हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क (Koregaon Park) भागात वीज चोरी करणाऱ्यांना चांगला दणका वीज मंडळाने दिला आहे. मीटरमध्ये बदल करुन 3 लाख 37 हजार 215 युनिटची वीज चोरी (Electricity Theft) उघड झाली आहे. लाखांमध्ये केलेल्या या वीज चोरीसाठी आता कोट्यवधी रुपये दंड आकारला गेला आहे. महावितरण (Mahavitaran) हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपये बिल आणि दंड आकारणी करणार आहे. यामुळे वीज चोरांना आता सुधारा, अन्यथा कैद व दंड असा दोन्ही शिक्षा होणार असल्याचे महावितरणने म्हटलंय.

पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरातील अनेक भागात तपासणी मोहीम सुरु करण्यात आली. वीज मीटरच्या सीलमध्ये छेडछाड करून मीटरमध्ये बदल करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

दंड आणि वीज बिल

वीज ग्राहकांना 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांची बिले देण्यात आली आहेत. हे बिल क्लिअर केल्यानंतर ग्राहकाने 6.6 लाख रुपयांचा दंडही भरला आहे. प्रादेशिक संचालकांनी पत्रकाद्वारे 20 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

विशेष मोहीम

महावितरणच्या कडक मोहिमेमुळे मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरीची प्रकरणे पकडली जात आहेत. प्रादेशिक संचालकांच्या सूचनेनुसार पुणे, सांगली, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. भविष्यातही ही मोहीम अशाच प्रकारे सुरू राहणार आहे.

मीटरजप्ती व मोठा दंड

वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. वीज चोरी पकडली गेल्यास वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. हे पर्याय न स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होतो. तसेच मीटर जप्त करून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

मीटरची तपासणी कधीही होऊ शकते

वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे पथक सदैव तयार असतात. एखाद्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याची शंका आल्यास हे पथक छापे टाकतात. यासंदर्भात पथकाला अनेक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळत असते. वीज चोरी पथक व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...