AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तानाजी सावंतांच्या मुलाने बँकॉक जाण्यासाठी कितीचा खर्च केला? त्याला घेऊन जाणारं ते खासगी विमान कोणाच्या मालकीचं? वाचा A टू Z माहिती

आता तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत ज्या खासगी चार्टर विमानाने बँकॉकला जात होता, त्या विमानाची माहिती समोर आली आहे. तसेच त्या विमानात आणखी कोण होतं, याबद्दलही सविस्तर माहिती समोर आली आहे.

तानाजी सावंतांच्या मुलाने बँकॉक जाण्यासाठी कितीचा खर्च केला? त्याला घेऊन जाणारं ते खासगी विमान कोणाच्या मालकीचं? वाचा A टू Z माहिती
Rishiraj Sawant tanaji sawant
| Updated on: Feb 11, 2025 | 6:08 PM
Share

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर खुद्द तानाजी सावंत यांनी ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रासोबत बँकॉक गेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही, त्यामुळे आम्हाला चिंता वाटली, असे तानाजी सावंत म्हणाले. आता तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत ज्या खासगी चार्टर विमानाने बँकॉकला जात होता, त्या विमानाची माहिती समोर आली आहे. तसेच त्या विमानात आणखी कोण होतं, याबद्दलही सविस्तर माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे काल पुण्यातून अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काही तासांनी ऋषीराज सावंत हे त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याची माहिती समोर आली. माजी मंत्री सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.

माझा मुलगा आणि मी दिवसातून पंधरा ते वीस वेळेस फोनवर बोलत असतो किंवा तो घरातून बाहेर जाताना मोठ्या मुलाला सांगत असतो. आज मात्र तो आम्हाला न सांगता दुसऱ्याच गाडीतून मित्रांसोबत विमानतळावर गेला, असे आम्हाला चालकाने सांगितले. त्यामुळे चिंता वाटू लागली. यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना याची माहिती दिली. सध्या तो खाजगी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे.

बँकॉककडे घेऊन जाणारे विमान खासगी कंपनीचे

आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. ऋषिराज सावंत आपल्या दोन मित्रांसोबत बॅंकॉकला निघाला होता. तब्बल 68 लाख रुपये खर्च करून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होते, अशी माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे देन मित्र होते. ऋषिकेश सावंत बँकॉककडे घेऊन जाणारं विमान एका खासगी कंपनीचे आहे. या प्रायव्हेट चार्टर्डच्या तिकीटवर या Global Passenger Manifest या कंपनीचा पत्ता देण्यात आलेला आहे.

सदाशिव पेठ flat no 101 अमृत सिद्धी अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क, भिडे हॉस्पिटलच्या मागे या ठिकाणी चार्टर्ड कंपनीचे ऑफिस आहे. या पत्त्यावर टीव्ही ९ मराठीची टीम पोहोचल्यानतंर कंपनीचे कार्यालय मात्र गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी एका खाजगी बिल्डरचं ऑफिस आहे. तीन ते साडेतीन वर्ष अगोदर या कंपनीचा ऑफिस या इमारतीत होतं. मात्र, त्यानंतर ते दुसरीकडे गेले आहेत, असं या इमारतीतील नागरिकांनी सांगितलं. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, याच कंपनीचं हे प्रायव्हेट प्लेन होतं का? ऋषिराज सावंत यांनी या कंपनीला नक्की किती पैसे भरले होते? बँकॉकला घेऊन जाण्यासाठी त्यांनी कधी बुकिंग केली होती?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.