‘रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही’, पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

राज्यातील महत्वाच्या पुणे-नाशिक रेल्वे आणि पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या जमीन संपादनाला खेडमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. याविरोधात शेतकरी उपविभागीय आधिकारी कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी व गाथा पारायण करत आंदोलनाला बसले.

'रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही', पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

पुणे : राज्यातील महत्वाच्या पुणे-नाशिक रेल्वे आणि पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या जमीन संपादनाला खेडमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. याविरोधात शेतकरी उपविभागीय आधिकारी कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी व गाथा पारायण करत आंदोलनाला बसले. पुणे नाशिक रेल्वे व पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. या विरोधात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी व गाथा पारायण करत आंदोलनाला सुरुवात केलीय (Farmers protest against Pune Nashik railway and Pune ring road land acquisition in Khed).

आळंदी, चिंबळी, मोई, मरकळ परिसरातील शेतकरी भूमिहिन होत असताना तुटपुंज्या शेतीवर प्रकल्प कशासाठी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केलाय. ‘पुणे नाशिक रेल्वे, रिंग रोड हटावा शेतकरी बचाव’ असा नारा देत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. रक्त सांडलं तरी प्रकल्पाला जमिनी देणार नाही, अशी भूमिका आंदोलक घेत आहेत. त्यांनी चक्रीउपोषणाला सुरुवात केलीय.

खेड तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी हा वारकरी संप्रदायाच्या संस्कारावर चालणारा आहे. त्यामुळे हरिनामाचे नाम मुखात घेऊन ज्ञानेश्वरी व गाथा या ग्रंथांचे वाचन करत अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी केलंय. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन या भूसंपादनाला होणारा विरोध कसा हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास 7 महिने पूर्ण, राष्ट्रपतींनी यात लक्ष घालावे, संयुक्त किसान मोर्चाचे शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

’30 वर्षात 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दान नको हक्क द्या’, शेतकरी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

शेतकरी आंदोलनासोबत उभं राहून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करा, प्रतिभा शिंदेंची शरद पवारांकडे मागणी

व्हिडीओ पाहा :

Farmers protest against Pune Nashik railway and Pune ring road land acquisition in Khed

Published On - 10:27 pm, Tue, 29 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI