Video: ताई, मामा माझी वीज कापली, लाखो रुपयांचा ऊस जळतोय; सुप्रिया सुळे,दत्तात्रय भरणेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

इंदापूर तालुक्यातील काल झालेल्या झगडेवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यानं व्यासपीठावरच दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री भरणे यांनी व्यासपीठावर शेतकऱ्याची समजूत काढली.

Video: ताई, मामा माझी वीज कापली, लाखो रुपयांचा ऊस जळतोय; सुप्रिया सुळे,दत्तात्रय भरणेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 6:39 PM

पुणे: इंदापूर तालुक्यातील काल झालेल्या झगडेवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यानं व्यासपीठावरच दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री भरणे यांनी व्यासपीठावर शेतकऱ्याची समजूत काढली. थकीत बील नसताना ही वीज कनेक्शन तोडल्या मुळे लाखो रुपयांचा ऊस जळू लागल्याने शेतकरी निराश होता. ‘ते’ कनेक्शन एक दिवस अगोदरच जोडलेले असल्याचं महावितरण कडून सांगण्यात आलं आहे. खातरजमा न करता शेतकऱ्यांनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.

काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत झगडेवाडीतील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर यांनी कार्यक्रम व्यासपीठावरच दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. हा कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर हे व्यासपीठावर येऊन ताई व मामा माझी शेतीचे वीज कनेक्शन कोणतेही थकीत बील नसताना तोडली गेल्याने लाखो रुपयांचा उभा ऊस जळू लागला आहे. आता मी काय करू म्हणत स्वतःच्या खिशातील दोर काढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसंगावधान दाखवल्याने व त्या शेतकऱ्याची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला. आज आता या संदर्भात बारामती विभागाच्या महावितरण मंडळाने यावर प्रेसनोट देत खुलासा केला आहे.

‘ते’ कनेक्शन एक दिवस अगोदरच जोडलेले

शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर यांचे थकबाकीसाठी १८ ऑगस्ट रोजी तोडलेले वीज कनेक्शन त्यांनी थकबाकी भरताच २० ऑगस्ट रोजीच जोडून दिले होते. मात्र, खातरजमा करण्यापूर्वी त्यांनी झगडेवाडी येथील कार्यक्रमात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी शिवाजी चितळकर यांना उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेतून १६ केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र दिलेले आहे. त्यावर त्यांना ३ अश्वशक्ती क्षमतेचे कनेक्शन दीड वर्षांपूर्वी दिले असून त्यांचा ग्राहक क्र. 187180002629 असा आहे. बारामती परिमंडलात शेतीसह सर्वच वर्गवारीतील थकबाकीची वसूली मोहीम जोरात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून १८ तारखेला शिवाजी चितळकर यांचा वीजपुरवठा 2740 रुपये थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करताच दुसऱ्या दिवशी चितळकर यांनी बील भरले. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा 20 ऑगस्टला पूर्ववत करण्यात आला होता मात्र त्यांनी कोणतीही खातरजमा न करता आंदोलन केल्याचे महावितरणचे म्हणणं आहे.

इतर बातम्या:

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

फ्लावर-कोबी करताय, मग सावधान, ‘या’ कंपनीचं बियाणं बोगस असल्याचा गंभीर आरोप

Farmers trying to commit suicide in the programme at Indapur in the programme of Supriya Sule and Dattatray Bharane

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.