Pune News : पिकअप ट्रकमधून सामान काढत असतानाच काळाची धडक, भरधाव वेगाने कार आली अन्… पुण्यात 8 जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेऊरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातात एका कार आणि पिकअप ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात पुरूष आणि एक महिला आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी एक अतिशय भयानक आणि हृदयाचा थरकाप उडवणारा रस्ता अपघात घडला. जेजुरी मोरगाव रोडवर झालेल्या या अपघातात 8 जण दगावले. या अपघातात सात पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक पुरूष, एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाली.
पुण्यात बुधवारी एक अतिशय बयानक अपघात झाला असून त्यामध्ये 8 जमांना जीव गमवावा लागला. जेजुरी मोरगाव रोडवरील पिक्प ट्रकला कारची जोरदार धडक बसली आणि दुर्दैवी घटनेत 8 माणसांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या आसपास जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. त्यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जबर जखमी झाले. यामुळे पर्चंड खळबळ माजली असून जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी-बारामती रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम हॉटेलम्ये एका पिकअप ट्रकमधून फ्रीज काढण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळेस भरधाव वेगाने एक कार आली आणि त्या कारमने टेम्पोला अचानक धडक दिली. ती एवढी भीषण होती की 8 जण जागीच ठार झाले.मृतांमध्ये सात पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एक पुरूष, एक महिला व लहान मुलांसह एकूण 5 जण जबर जखमी झालेत.
अपघातात ठार झालेल्यांचा मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर 5 जखमी नागरिकांवर जेजुरीच्या शांताई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदापूर तालुक्यातील 2, भोर तालुक्यातील 1 तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश मधील प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे.
मृतांची नावं खालीलप्रमाणे
1. सोमनाथ रामचंद्र वायसे – निवासी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 2. रामू संजीवनी यादव – निवासी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 3. अजय कुमार चव्हाण – निवासी, उत्तर प्रदेश 4. अजित अशोक जाधव – निवासी, कांजळे, तालुका भोर, जिल्हा पुणे 5. किरण भारत राऊत – निवासी, पवारवाड़ी, तालुका इंदापुर, जिल्हा पुणे 6. अश्विनी संतोष एस.आर. – निवासी, सोलापुर 7. अक्षय संजय राऊत – निवासी, झारगडवाड़ी, तालुका बारामती, जिल्हा पुणेृ 8. एक अज्ञात पुरुष – त्याची अद्याप ओळख पटलेली नाही
