Pune Ganeshotsav : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा देखाव्याच्या उंचीवर मर्यादा, पुणे पोलिसांनी मंडळांना काय सूचना केली?

मिरवणुकांच्या मार्गात मेट्रोचा पूल आहे. वास्तविक हे काम सुरू असताना गणेश मंडळांनी विरोध केला होता. मात्र आराखडा बदलता येणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आल्याने त्यावर निर्णय झाला नाही.

Pune Ganeshotsav : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा देखाव्याच्या उंचीवर मर्यादा, पुणे पोलिसांनी मंडळांना काय सूचना केली?
दगडूशेठ गणपती, पुणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 10:40 AM

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत (Immersion procession) यंदा देखाव्याच्या उंचीवर मर्यादा असणार आहेत. लकडी पुलावर असलेल्या मेट्रोच्या ब्रिजमुळे रथाची उंची कमी, मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी (Pune police) शहरातील गणेश मंडळांना अशाप्रकारच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी विसर्जन मिरवणुका या अलका चौकातून लकडी पुलावरून पुढे डेक्कनकडे मार्गस्थ होतात. मेट्रोच्या ब्रिजची उंची 21 फुट असल्याने देखाव्यासह 18 फुटच उंची ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील महिन्यातही अशाप्रकारची बैठक पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये झाली होती. रथाची उंची 21 फुटांच्या आतच असायला हवी. अथवा तो रथ हा तेवढ्या उंचीच्या खाली फोल्ड करावा लागणार आहे. शहरात सध्या विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रोचे (Pune metro) कामदेखील अनेक ठिकाणी सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी या सूचना केल्या आहेत.

मिरवणुकांच्या मार्गात मेट्रोचा पूल

पुणे मेट्रो शहरातील वनाज ते रामवाडी या मार्गावरून असेल. अद्याप कामे अपूर्ण आहेत. मात्र मेट्रोच्या पुलाचा हा आराखडा तयार करताना विसर्जन मिरवणुका ध्यानात घेण्यात आल्या नाही. पुण्यातील विसर्जन मिरवणुका या अलका चौकातून लकडी पुलावरून डेक्कनकडे मार्गस्थ होत असतात. अशावेळी याठिकाणी मिरवणुकांच्या मार्गात मेट्रोचा पूल आहे. वास्तविक हे काम सुरू असताना गणेश मंडळांनी विरोध केला होता. मात्र आराखडा बदलता येणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आल्याने त्यावर निर्णय झाला नाही. आता मेट्रोचे काम सुरुही झाले असून काही ठिकाणी ते पूर्णही झाले आहे.

हे सुद्धा वाचा

गणेश मंडळांचा हिरमोड

पुणे पोलीस, गणेश मंडळे तसेच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या ठिकाणची उंची मोजली होती. ती 21 फूट होत आहे. संभाजी पुलावरील रस्ता तसेच मेट्रोचा पूल यांतील अंतर 21 फूट आहे. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांनंतर धडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने यंदा गणेश मंडळे वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुका काढतील, यात शंकाच नाही. मात्र रथाची उंची कमी ठेवावी लागणार असल्याने काहीसा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.