AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol | माझा नवरा वाघ होता मी त्याची वाघीण, जोपर्यंत… शरद मोहोळच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Sharad Mohol Murder Update : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत मात्र आणखी नवनवीन खुलासे होण्याची शक्यत आहे. अशातच यावर स्वाती मोहोळ यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

Sharad Mohol | माझा नवरा वाघ होता मी त्याची वाघीण, जोपर्यंत... शरद मोहोळच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
Sharad Mohol Wife Swati mohol first reaction on murder
Harish Malusare
Harish Malusare | Edited By: | Updated on: Jan 09, 2024 | 12:06 PM
Share

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला मुन्ना पोळेकर याने ट्रॅप लावत आपल्या साथीदारांसह मोहोळला संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या स्वाती मोहोळ?

माझा सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे. माझे पती हिंदुत्त्ववादाचं काम करत होते म्हणून ही घटना झाली आहे. ज्यांना वाटत आहे की त्यांचं असं करून मी खचून जाईल. त्यांना माझं एकच सांगणं आहे, मी हिंदुत्त्वावाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघिण आहे. हिंदुत्त्ववादासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार असल्याचं स्वाती मोहोळ यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची राहत्या घरी जात भेट घेतली.

स्वाती मोहोळ या भाजपतच्या महिला पदाधिकारी आहेत. 2022 साली स्वाती मोहोळ यांनी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी  महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली.

राजकीय चर्चा करायला आलो नाही. मोहोळ कुंटुंबाने आपलं हिंदुत्त्ववादी काम सुरू ठेवायला हवं. ताईंनी ताकदीने आपलं काम पुढे घेऊन जावं. हिंदु समाजावर संकट आलं की शरद मोहोळ उभे राहिले आहेत. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीचा प्रयत्न पसरवण्याचा प्रयत्न करू नये. त्याबद्दल मोहोळ कुटुंबियांची नाराजी आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रात कसे आले आणि का आले याची कोणालाच माहिती नाही. त्यामुळे चुकीचा प्रतिमा तयार करणं थांबवावं,  नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दिवसाढवळ्या दीड वाजता हत्या करण्या आली होती. या हत्या प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अटकेत आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार