AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना नाही आम्हाला द्या, येथील गावकऱ्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारी कर्मचाऱ्याचे पगार चांगले आहेत. शिवाय काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात. त्यांच्या पगाराला हात लागत नाही. अशावेळी त्यांना पेन्शनची गरज काय, असा सवाल गावकरी विचारत आहेत.

जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना नाही आम्हाला द्या, येथील गावकऱ्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| Edited By: | Updated on: Mar 20, 2023 | 10:54 AM
Share

पुणे : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सातव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांची बरीच कामं खोळंबली आहेत. नागरिक संतप्त झाले आहेत. कोल्हापूर येथील युवकांनी आम्ही अर्ध्या पगारात काम करण्यास तयार असल्याचं सांगून जुनी पेन्शन योजनेला विरोध केला. काही गावांमधून जुनी पेन्शन योजनेला विरोध होत आहे. सरकारी कर्मचाऱ्याचे पगार चांगले आहेत. शिवाय काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात. त्यांच्या पगाराला हात लागत नाही. अशावेळी त्यांना पेन्शनची गरज काय, असा सवाल गावकरी विचारत आहेत.

पेन्शन शेतकऱ्यांना सुरू करा

ग्रामपंचायतीने संपावरील कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे. पुणे जिल्ह्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा निषेध करत जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांना सुरू करा, अशी मागणी केली. रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नाना रौंधळ यांची पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्राची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

कर्मचाऱ्यांना गडगंज पगार

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा. राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कर्मचाऱ्यांना गडगंज पगार आणि भ्रष्टाचार या सर्वांचा विचार करता यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे योग्य नाही. असा पत्रातील मजकूर आहे.

कर्मचाऱ्यांना पेन्शनची गरज काय?

एकंदरित सरकारी कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम आहेत. पण, या मागणीला आता राज्यातील जनता विरोध करताना दिसून येत आहे. रौंधळवाडी येथील गावकऱ्यांनी पत्र लिहून पेन्शनची गरज कर्मचाऱ्यांना नसून शेतकऱ्यांना आहे, अशा आशयाचे पत्र थेट मुख्यमंत्री यांना लिहिले. त्यामुळे या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पेन्शनची गरज शेतकऱ्यांना

राज्यात बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. शेतकरी वर्षभर राबराब राबतो. त्यांना पिकाचा मोबदला योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पेन्शनची गरज आहे, असे या गावकऱ्यांनी पत्रात लिहिली आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.