भरधाव एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटले; त्यानंतर घडली अशी थरारक घटना

ही थरारक घटना प्रवाशांनी स्वतः अनुभवली. रुग्णालयात गेल्यानंतरही ते भीतीने कापत होते. या घटनेनंतर प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहिला.

भरधाव एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटले; त्यानंतर घडली अशी थरारक घटना
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 8:41 AM

परभणी : एसटी बसपैकी बऱ्याच बस या भंगार अवस्थेत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांशिवाय प्रवासांना त्रास होतो. काही चालकांच्या कंबरदुखीचे त्रास सुरू झाले आहेत. या भंगारात काढण्यायोग्य काही बस अजूनही रस्त्यावर धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अशीच एक घटना परभणीमध्ये घडली. येथील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे स्टेरिंग तुटल्याने अपघात झाला. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी बसले होते. या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. ही थरारक घटना प्रवाशांनी स्वतः अनुभवली. रुग्णालयात गेल्यानंतरही ते भीतीने कापत होते. या घटनेनंतर प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहिला.

BUS 2 N

सोनपेठ ते गंगाखेडच्या बसला अपघात

एसटीचा स्टेरिंग तुटल्याने अपघात झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ येथे घडली. अपघातात नऊ प्रवासी जखमी झालेत. ही बस सोनपेठ येथून गंगाखेडकडे जात होती. जखमींना सोनपेठ ग्रामीण रुग्णालय आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस शेतात शिरली

सोनखेड-गंगाखेड बसचे स्टेअरिंग रॉड तुटले. हा अपघात रविवारी सायंकाळी झाला. सोनपेठ येथून साडेपाच वाजता गंगाखेड आगाराची बस निघाली. ही बस शेळगाव ते सायखेडदरम्यान होती. तेवढ्यात स्टेरिंगचे रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस शेतात जाऊन उलटली. या बसमध्ये असलेल्या ३० प्रवाशांपैकी ९ प्रवासी जखमी झाले.

जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात पाठवले

जखमींमध्ये भिसेगाव येथील अश्रुबा लोखंडे, संतोष कदम, शेळगाव येथील भानुदास वाघमारे या तीन प्रवाशांना सोनपेठच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. इतर जखमींना परळी आणि गंगाखेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघातानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर गवारे, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड, अमर केंद्रे आणि मनोज राठोड यांना घटनास्थळी भेट दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मदत केली.

एसटी बस उलटल्याचे पाहून आजूबाजूचे लोकं धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. पोलिसांना फोन केला. रुग्णावाहिका बोलावली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी प्रवाशांच्या मनात भीतीचा थरकाप उडाला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.