AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Fortuner Gift : मानलं भावा, पहिल्यांदाच लढला, सरपंच झाला, मित्रांनी दिली फॉर्च्युनर कार गिफ्ट

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही पहिल्याच झटक्यात विजयी होऊन थेट सरपंच झाले. पहिल्याच झटक्यात सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली.

Pune Fortuner Gift : मानलं भावा, पहिल्यांदाच लढला, सरपंच झाला, मित्रांनी दिली फॉर्च्युनर कार गिफ्ट
| Updated on: Jan 12, 2023 | 9:17 PM
Share

पुणे : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, या प्रमुख पक्षांसह एकाच पक्षाची 2 शकलं झालेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही पहिल्याच झटक्यात विजयी होऊन थेट सरपंच झाले. पहिल्याच झटक्यात सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली आहे.

दत्तात्रय हरगुडे असं या फॉर्चुनर कार गिफ्ट मिळालेल्या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव आहे. दत्तात्रय पुण्यातून केसनंद ग्रामपंचायतीतून पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आला. आपला मित्र पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. मित्रांनी एकच जल्लोष केला.

आता मित्र सरपंच झाल्यावर जल्लोष तर होणारच. साधारणपणे मित्रासोबत काही चांगलं झालं की त्याच्याकडून पार्टी घेण्याची पद्धत असते. मात्र दत्तात्रयच्या मित्र परिवाराने उलट केलं. दत्तात्रयला थेट फॉर्चुनरसारखी स्टेटस सिम्बॉल असणारी कार गिफ्ट म्हणून दिली. तर मित्रांनी फॉर्चुनर कार दिल्याने दत्तात्रय भारावून गेला.

दत्तात्रय हरगुडेची पहिली प्रतिक्रिया

“सरपंचपदी निवड झाल्याने मला फॉचुनर कार मला गिफ्ट दिली यासाठी सर्व मित्रांचे आभार मानतो. या भेटीचा मी गावाच्या विकासासाठी 100 टक्के प्रयत्न करेन. मित्रांचं माझ्यावर असंच प्रेम रहावं”, असं म्हणत दत्तात्रय हरगुडेने मित्रांचे आभार मानले.

मित्र परिवाराची प्रतिक्रिया

“आबा (दत्तात्रय) कधीच स्वत:वर खर्च करत नाहीत. त्यांनी गावासाठी आणि समाजासाठी खर्च केलाय. आबांनी आतापर्यंत समाजाला भरभरुन दिलं. आता आपण त्यांना देण्याची वेळ आहे. या जाणिवेतून आम्ही आबांना फॉर्चुनर कार गिफ्ट देण्याचं ठरवलं”, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय यांच्या मित्रांनी दिली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.