AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील या समस्येवर पालकमंत्र्यांनी कायमचा तोडगा काढला; भविष्यात ही समस्या उद्भवणारच नाही

या संपाचा विद्यार्थी, नोकरदारांच्यासह लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. त्यानंतर तातडीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून तातडीने हा संप मिटवला.

पुण्यातील या समस्येवर पालकमंत्र्यांनी कायमचा तोडगा काढला; भविष्यात ही समस्या उद्भवणारच नाही
| Updated on: Mar 12, 2023 | 6:29 PM
Share

पुणे : पुणे हे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही असा निर्णय आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीती झालेल्या बैठकीत पीएमपीएमएल आणि ठेकेदारांकडून करण्यात आला. पीएमपीएमएलच्या 4 ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज पीएमपीएमएल, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदारांची एकत्रित बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झाली.

या बैठकीला पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रमुख ठेकेदार उपस्थित होते.

पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे.तसेच वास्तव्यासाठी देखील सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या पाहता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलवर अवलंबून आहे. सर्वाधिक पुणेकर पीएमपीएमएलच्या बसएसमधू प्रवास करतात.

मात्र, पीएमपीएमएलच्या ठेकेदारांचे गेल्या 3 महिन्यांच्या बिल न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून अचानक संप पुकारला होता.

या संपाचा विद्यार्थी, नोकरदारांच्यासह लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. त्यानंतर तातडीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून तातडीने हा संप मिटवला. त्यावेळी पीएमपीएमएलकडून ठेकेदारांना 66 कोटी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उर्वरित देयक आणि पुढील धोरण निश्चितीसाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी जानेवारी पर्यंतची तूट मार्च अखेर पर्यंत द्यावे,

तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे देयक 15 एप्रिल पर्यंत द्यावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या आहेत.

तसेच, भविष्यात पीएमपीएमएलकडून दर महिन्याला बिल दिले जाईल, असेही यावेळी ठेकेदारांना आश्वास्त करण्यात आले आहे. त्यावर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Follow Us
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.