Vidyanand Bapat : संवग प्रसिद्धी या शब्दावरुनच हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा विद्यानंद बापटला इशारा
Vidyanand Bapat : डीजेबाबत आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर तिव्र शब्दांत टीका केली. आता संवग प्रसिद्धी या शब्दावरुनच हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने विद्यानंद बापट यांच्यावर इशारा साधला आहे.

Vidyanand Bapat: गणेशोत्सवापूर्वी पासून राज्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु होता. आता गणरायाच्या विसर्जनानंतर देखील वाद अद्याप शमलेला नाही. डीजेबाबत आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर ‘शेण खाऊन माजलेले आणि गोमूत्र पिऊन माजलेले देवभोळे, धर्मभोळे उत्सवखोर..’ अशा तिव्र शब्दांत टीका केलीय. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. आता संवग प्रसिद्धी या शब्दालवरुनच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांनी इशारा दिला आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी विद्यानंद बापट यांना इशारा दिला आहे. ‘विद्यानंद बापट हे सवंग प्रसिद्धीसाठी गणेशभक्तांच्या संदर्भात चीतावणीखोर वक्तव्य करीत आहेत…’, असा आरोप विद्यानंद बापट यांनी केला आहे. ‘विद्यानंद बापट यांना पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी समज द्यावी… विद्यानंद बापट यांना ध्वनी प्रदूषण या विषयावर नागरिकांचा पाठींबा व प्रसिद्धी मिळाली, परंतु ते गणेश भक्तांवर चीतावणीखोर वक्तव्य करीत आहेत..’
पुढे दामगुडे म्हणाले, ‘लाखांच्या घरात संख्या असलेल्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांविषयी गैर भाषा वापरून चिथावणी देत असल्याने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विद्यानंद बापट यांना समज द्यावी…’, अशी मागणी देखली दामगुडे यांनी केली आहे. अनेकांना विद्यानंद बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.
सांगायचं झालं तर, विद्यानंद बापट गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे चर्चेत आले आहेत. पण त्यांच्या अस्खलित मराठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या वक्तव्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एवढंच नाही तर, पुण्यात शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यानंद बापट यांच्याविषयी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधलं.कुणीही दीडशहाण येतंय आणि गणेशोत्सवात डीजे बंद करा म्हणतयं. बापटाचे वाल हललेले आहेत. कोणताही मायचा लाल आला तरी उत्सव बंद करू शकत नाही.’ अनेकांनी विद्यानंद बापटांवर निशाणा साधला आहे.
