AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटनिवडणूकीच्या प्रचारात नेत्यांचं नाही तर कुणाचं फावलं ? कसब्यात कसं आणि कुणी लुटलं ?

पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.अशा परिस्थितीत घरफोड्या झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोटनिवडणूकीच्या प्रचारात नेत्यांचं नाही तर कुणाचं फावलं ? कसब्यात कसं आणि कुणी लुटलं ?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 24, 2023 | 8:33 AM
Share

अभिजित पोते, पुणे : कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शो जोमात सुरु आहेत. नेते आणि त्यांच्या सभा म्हटलं की त्यासोबत पोलीस बंदोबस्त आलाच. प्रचारसभांसाठी पोलीस बंदोबस्तही चोख लावण्यात आलाय. या प्रचाराचं फळ नेमकं कोणत्या नेत्याच्या पारड्यात पडेल, हे काही दिवसात कळेलच. मात्र इकडे सामान्यांना मात्र चांगलाच फटका बसतोय. कसबा परिसरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि चोख बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. मागील 20 ते 22फेब्रुवारी दरम्यान घरफोडीतून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार राहिला बाजूला अन् या घरफोड्यांची चर्चाच जास्त रंगली आहे.

कुठे घडल्या घटना?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुनसार, हा प्रकार २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीच्या दरम्यान घडला. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळिग्राम प्रसाद अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील कामतकर यांची सदनिका असून, ती बंद होती. चोरट्यांनी या सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि 30हजार रुपयांची रोकड लांबवली. तसेच, याच परिसरातील अन्य एका सदनिकेतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा तीन लाख 70हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. यासोबतच चोरट्यांनी इतर चार सदनिकांमध्येही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.अशा परिस्थितीत घरफोड्या झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.तर प्रचाराचा कालावधी आज सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यानंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संघटना आणि राजकीय पक्षांवर कठोर कारवाई केली जाईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.मतदान बंद होण्याच्या 48 तास अगोदर मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते यांनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच