मुसेवाला हत्येतील आरोपी महाकाळ कसा झाला डॉन?, पुणे जिल्ह्यातील 19 वर्षांच्या तरुणाचा 5 राज्यांचे पोलीस करत होते तपास, आईच्या मृत्यूनंतर झाला गँगस्टर

सौरभ महाकाळला पुणे पोलिसांनी नगर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्या आठवड्यात अटक केली. तर संतोष जाधव याला रविवारी कच्छ भागातून पकडण्यात आले आहे. त्याच्यासोबत नवनाथ सूर्यवंशी नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. सध्या या तिघांची रवानगी 20 जूनपर्यंत पुण्यात पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

मुसेवाला हत्येतील आरोपी महाकाळ कसा झाला डॉन?, पुणे जिल्ह्यातील 19 वर्षांच्या तरुणाचा 5 राज्यांचे पोलीस करत होते तपास, आईच्या मृत्यूनंतर झाला गँगस्टर
saurav mahakalImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 8:32 PM

पुणे – संपूर्ण देशात गाजत असलेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhhu moosewala murder)हत्या प्रकरणात अचानक पुणे जिल्ह्यातील दोन गँगस्टर्सची नावे समोर आली. पंजाब पोलिसांनी याची माहिती दिली होती. ही नावे होती सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (Gangster Saurabh Mahakal)आणि संतोष जाधव. यातील सौरभ महाकाळला पुणे पोलिसांनी (Pune Police)नगर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्या आठवड्यात अटक केली. तर संतोष जाधव याला रविवारी कच्छ भागातून पकडण्यात आले आहे. त्याच्यासोबत नवनाथ सूर्यवंशी नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. सध्या या तिघांची रवानगी 20 जूनपर्यंत पुण्यात पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

सौरभ महाकाळ नारायणगावचा रहिवासी

सौरभ महाकाळ हा पुणे जिल्ह्यातील नारायणगावाजवळ राहतो. नातेवाईकांच्या मते त्याचे मत 17आहे, तर पोलीस सांगतायेत तो 19वर्षांचा आहे. महाकाळला मोक्काच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. 2021साली मंचरमध्ये झालेल्या ओंकार बाणखेले उर्फ राण्याच्या हत्येतील संतोष जाधवसोबत तोही एक आरोपी आहे. महाकाळची अनेक गावात दहशत असून, अवघ्या 19वर्षांच्या या तरुणाचा तपास पाच राज्यांचे पोलीस करत होते. त्यात महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

आईने पेट्रोल टाकून स्वताला पेटवून घेतले होते

महाकाळची आईने सात वर्षांपूर्वी, घरगुती भांडणात स्वताच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली होती. मृत सुनीता कांबळे यांनी हीरामण कांबळे यांच्याशी पळून जाऊन लग्न केले होते. सिद्धेशसह त्यांना चार मुले आहेत. ती सध्या कुठे आहेत, याचा पोलीस तपास घेतायेत.

हे सुद्धा वाचा

आईच्या मृत्यूनंतर महाकाळ झाला गुंड

आईच्या मृत्यूच्या वेळी महाकाळचे वय 12 वर्ष होते, तो जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकत होता. आई गेल्यानंतर तो बेलगाम झाला. ड्रायव्हर असलेले त्याचे वडील दिवसभर दारु पित असत. याच काळात महाकाळ वाईट संगतीत आला, त्याची ओळख संतोष जाधवशीही झाली. याच काळात त्याची गावात दहशत निर्माण झाली होती. सिद्धू मुसेवाला हत्येच्या आधी महिनाभरात तो गावात येऊन गेल्याचीही माहिती आहे.

सलमानला धमकीच्या मागे महाकाळचा हात

सलमान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र देण्यात महाकाळचाच हात असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून खंडणीचे रॅकेट चालवण्याचा महाकाळचा विचार होता असे मुंबई क्राईम ब्रांचचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत तीन राज्यांच्या पोलिसांनी त्याची चौकशी केल्याची माहिती आहे. त्याच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, आर्म्स एक्ट आणि मोक्कांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरोधात इतर राज्यांतील आणखी काही गुन्हेही समोर येण्याची शक्यता आहे. महाकाळ याच्या जवळ असलेल्या शूटरनेच मुसेवालाची हत्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिष्णोईच असल्याचेही दिल्ली पोलिसांनी सांगितले होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.