AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Fire : केमिकल कंपनीत 15 महिलांसह 18 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

मुळशीच्या उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली (how fire broke out in pune mulashi uravade chemical company)

Pune Fire :  केमिकल कंपनीत 15 महिलांसह 18 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?
जीवघेणी आग नेमकी लागली तरी कशी?
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 8:51 PM
Share

पुणे : मुळशीच्या उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून जवळपास 15 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही एक क्लोरोफाईड कंपनी होती. या कंपनीत सध्या सॅनिटाझर बनवलं जात होतं. मात्र, या कंपनीत आज दुपारी मोठा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत मोठी आग लागली. या आगीत होरपळून 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे (how fire broke out in pune mulashi uravade chemical company).

आग नेमकी कशी लागली?

संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. दुपारी अडीचच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत गेला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग जास्त भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे (how fire broke out in pune mulashi uravade chemical company).

घटनास्थळाची सध्याची परिस्थिती काय?

वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत 17 जण गमवल्याची तक्रार केली होती. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. ते सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जवान अजूनही रेस्क्यू करत आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळालं आहे. सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आगीच्या चौकशीचे आदेश

आग नेमकी कशी लागली? कशामुळे लागली? या सर्व दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आगीची दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ एक समिती देखील गठीत केली आहे. लवकरच या कंपनीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कंपनी मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

अग्निशम दल तातडीने घटनास्थळी दाखल

या घटनेबाबत अग्निशमन दलाला तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आता आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तिथे सध्या कुलिंगच काम सुरु आहे.

मुळशीत शोककळा

या घटनेमुळे संपूर्ण मुळशीत शोककळा पसरली आहे. मृतक सर्व महिला या गरीब घरातल्या होत्या. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे परिसरात खूप हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकांची ओळख पटणं देखील कठीण आहे.

स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल

ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

आगीच्या घटनेचा व्हिडीओ बघा :

संबंधित बातमी : Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 14 जणांचा मृत्यू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.