AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Exam 2022 पहिल्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार

बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आली आहे

HSC Exam 2022 पहिल्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, 'त्या' प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार
संग्रिहत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 5:19 PM
Share

 पुणे – बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) कालपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान काल बारावीच्या परीक्षेत इंग्रजी(English) विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary) देण्यात आली आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावी बोर्डाचे परीक्षा सुरु आहे. यामध्ये पहिल्याच झालेल्या इंग्रजीच्या BOS member व CM   संयुक्त सभेतील शिफारसीनुसार प्रश्न पत्रिकेतील प्रश्न 1 मधील A5 प्रश्नाला सूचना प्रिंट झाला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना फुल्लक्रेडिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथक कार्यरत

बारावीच्या बोर्ड परीक्षेला राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देत आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्ष परीक्षा न झाल्याने गुणवत्ता दर्जा घसरत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 9 हजार 635 केंद्रावर होणार परीक्षा होणार असून 5 आणि 7 मार्चला होणार पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला असून तो पेपर 5 आणि 7 एप्रिलला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

पेपरसाठी वाढीव वेळ

मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सवय लागली होती. परंतु गुणवत्ता घसरत असल्याची तक्रार आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आला आहे. परीक्षेच्या केंद्रावरती विद्यार्थ्यांनी वेळेच्या आगोदर पोहचायचं आहे. आज विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून त्यांना वाढीव वेळ देण्यात आला आहे. कारण दोन वर्षाच्या काळात परीक्षा ऑफलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव कमी असेल. 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी तब्बल पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. आज सुरू झालेली परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरू राहील.

Video: गॅरंटी, असं महाकाय जनावर वळवळत जाताना तुम्ही पाहिलं नसेल, कमजोर दिलवाले ना देखे

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

Pune fire | शहरात दिवसभरात विविध ठिकाणी आगीच्या 4 घटना ; जीवितहानी नाही, लाखो रुपयांचे नुकसान

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.