AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडचणीत आल्यामुळे IAS पूजा खेडकर फरार? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा

1995 ते 2005 च्या काळात 1 लाख 60 हजार स्केअर फूटाची जागा त्यांनी स्वतःच्या खिशातील पैशातून घेतला आहे. नॅशनल सोसायटीत 45 लाखांची जागा घेतली आणि त्यावर दीड कोटींचा बांधकाम केले. एवढी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला नॉन क्रिमिलेअर मिळू कसे शकते?

अडचणीत आल्यामुळे IAS पूजा खेडकर फरार? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा
| Updated on: Jul 24, 2024 | 11:30 AM
Share

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहे. त्यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. दोन वेळा समन्स बजावून त्या आल्या नाही. त्यानंतर मसूरी येथील आयएएस प्रशिक्षणार्थींसाठी असणारी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये त्यांना २३ जुलैपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या ठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत. पूजा खेडकर यांना कळले आहे की आता आपल्याकडे पळवाट राहिली नसल्याने पळून गेल्या असाव्यात, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

नॉन क्रिमिलेअर मिळाले कसे

विजय कुंभार यांनी म्हटले आहे की, पूजा खेडकर यांना कळले आहे की आता आपल्याकडे पळवाट राहिली नाही. त्यांची आई कारागृहात आहे. वडिलांची चौकशी सुरु आहे. अडचणी आल्यामुळे त्या पळून गेल्या असाव्यात. मनोरमा खेडकर यांच्याकडे दोन कोटींचा बंगला आहे. कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळाले कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची माहिती मागितली आहे. त्यावर बोलताना विजय कुंभार म्हणाले की, 2003 पासून घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते विभक्त झाले आहेत की नाही याचा फरक पडत नाही. मनोरमा खेडकर यांचे वडील आणि पती हे क्लास वन अधिकारी होते त्यांना नॉन क्रिमिलेअर घेत येत नव्हते म्हणून त्यांनी घटस्फोट घेतल्याचे भासवले.

प्रतिज्ञापत्र खोटे दिले

1995 ते 2005 च्या काळात 1 लाख 60 हजार स्केअर फूटाची जागा त्यांनी स्वतःच्या खिशातील पैशातून घेतला आहे. नॅशनल सोसायटीत 45 लाखांची जागा घेतली आणि त्यावर दीड कोटींचा बांधकाम केले. एवढी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला नॉन क्रिमिलेअर मिळू कसे शकते? यामुळे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले आहे ते खोटे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ते पती- पत्नी असल्याचं दाखवले आहे. उत्पन्न जाहीर केले आहे. एकंदरीत त्यांच्याकडे सर्व गोंधळ आहे. या सर्व प्रकरणाची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनेही चौकशी सुरु केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.