AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्याबाईला मिशा असत्या तर… असले धंदे बंद करा, अजित दादांनी खडसावलं

शिंदे सरकारला 100 दिवस झालेत. मग काय करता त्याचं, सत्कार करता त्यांचा?, असा सवालही अजित पवार यांनी केला.

आत्याबाईला मिशा असत्या तर... असले धंदे बंद करा, अजित दादांनी खडसावलं
अजित दादांनी खडसावलं Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 09, 2022 | 7:55 PM
Share

नवीन पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : साखर कारखान्याच्या (Sugar Factory) गळीत हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला. कार्यक्रमाला अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थिती लावली होती. 2014 सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पराभव झाला. असं विचारताचं अजित दादा म्हणाले, आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं असले धंदे बंद करा. 2014 जावून आपण 2022 मध्ये आलोय.. जुनं कुठं उकरुन काढता. झालं गेलं गंगेला मिळालं. नवीन बोला. नवीन आमची सुरुवात आहे.

शिंदे सरकारला 100 दिवस झालेत. मग काय करता त्याचं, सत्कार करता त्यांचा?, असा सवालही अजित पवार यांनी केला.

आमचं बारामतीकरांशी जुनं नातं आहे. कुणी येत असेल तर यावं, त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्याकडून कोणीही वेडंवाकडं बोलणार नाही. त्यांचा अनादर करणार नाही. त्यांचे विचार ऐकावेत.

आमचे ऐकावेत. जे कुणी महाराष्ट्राला, जिल्ह्याला आणि बारामतीला पुढे नेणारे असतील त्यांच्या पाठीशी बारामतीकर उभे राहतील. याचा ठाम विश्वास मला आहे, असंही अजित पवार म्हणाले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतं असा निकाल येईल असं वाटलंच होतं. मागचे निकाल पाहता बैलजोडीच्या वेळी सिंडीकेट-इंडिकेट झालं. त्यावेळी बैलजोडी गोठवून दुसरं चिन्ह दिलं. त्यानंतर गाय वासरु गोठवून पंजा आणि राष्ट्रवादीला घड्याळ अशा प्रकारचं चिन्ह दिलं असल्याचं पवारांनी सांगितलं.

नांगरधारी शेतकरी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे असतील. जनसंघाचे पणती चिन्ह होतं. ते जनता पक्षात गेल्यावर नांगरधरी शेतकरी चिन्ह दिलं. नंतर मग कमळ दिलं. अशा घटना मागे झालेल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेना हा पक्षच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला माहितीय. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार निवडणूक आयोगाला दिला. निवडणूक आयोगाने असा निकाल देवून सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.