AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याचा दाऊदशी संबंध जोडला जातो, माझाही संबंध जोडला होता; पवारांकडून मलिकांना क्लीनचिट

मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक या पध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रीमंडळातून काढा असं बोलताय. कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही.

मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याचा दाऊदशी संबंध जोडला जातो, माझाही संबंध जोडला होता; पवारांकडून मलिकांना क्लीनचिट
Sharad PawarImage Credit source: TV9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 05, 2022 | 2:40 PM
Share

पुणे – नवाब मलिकांवर (Nawab Malik) कारवाई ही राजकीय हेतूनं करण्यात आली आहे. 20 वर्षात कधी कारवाई झाली नाही आणि ते मुस्लीम आहेत म्हणून दाऊदशी संबंध जोडला जातो. माझ्यावरही तसे आरोप करण्यात आले होते. मात्र नारायण राणेंना (Narayan Rane) वेगळा न्याय आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय का? असे पवारांनी विचारले आहे. त्यांना अटक झाली म्हणून राजीनामा मागतात मग आमचे सिंधुदुर्गचे माझी सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा घेतला हे माझ्या वाचनात आलं नाही.अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.

कदाचित त्याचा खुलासा मोदी करतील

मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक या पध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रीमंडळातून काढा असं बोलताय. कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

मी काही ज्योतिषी नाही

पाच राज्य निवडणुकांत काय होईल हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मात्र काय होईल हे बघू काल मंत्रीमंडळात काय चर्चा झाली माहिती नाही मात्र जो काही निर्णय घेतली तो त्यांच्या हिताचा असेल. फोन टँपिंग होतायत हे मी स्वतः पाहिलंय. मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा या घटना घडल्यात. वरिष्ठ सांगतात म्हणून अधिकारी तसं करत होते मात्र याची किंमत अधिकाधिऱ्यांना चुकवावी लागेल. नाना पटोले काय म्हटले तो त्यांचा प्रश्न आहे.

Video viral : माकडाची अद्भुत युक्ती! यूझर्स म्हणाले, ‘वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..!

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 5 March 2022

‘चला हवा येऊ द्या’मधला विनोदवीर घेणार ब्रेक? कोण आहे तो विनोदवीर, काय आहे ब्रेकमागचं कारण?

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?