Pune crime| ‘तुला स्टॉल चालवायचा असेल महिना 10  हजार रुपये द्यावे लागेल तडीपार गुंडांकडून खंडणी वसूल

Pune crime| ‘तुला स्टॉल चालवायचा असेल महिना 10  हजार रुपये द्यावे लागेल तडीपार गुंडांकडून खंडणी वसूल
प्रातिनिधिक छायाचित्र.

विविध गुन्हयांखाली तडीपार असलेले गुंड आपलया साथीदारांच्या माध्यमातून शहरात सक्रिय राहतात. लोकांना छळत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. या गुंडांवर व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना जरब बसवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्याकडून सातत्याने केली जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 18, 2022 | 4:52 PM

पुणे – शहरात पोलिसांनी तडीपार केल्यानंतर आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉल चालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत टिंगरेनगर येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा गुंडांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. शकील शब्बीर शेख (वय 23) आणि समीर शब्बीर शेख (वय 27दोघे रा. लोहगाव) अशी त्यांची नावे आहेत.

महिना १० हजार रुपये द्यावे लागेल याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात चायनीजची गाडी लावतात. फिर्यार्दी व त्यांचे 2  कामगार चायनीज स्टॉलवर असताना 7  जानेवारी रोजी रात्री 8  वाजता शकील शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना ‘‘आपको समीर भाईने बोला था ना, चायनीज का स्टॉल चलाने का है तो महिने का 10 हजार रुपये देना पडेगा ये ले समीर भाई से बात कर’’ असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावर समीर शेख याने ‘‘तुला स्टॉल चालवायचा असेल महिना 10 हजार रुपये द्यावे लागेल,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन शकील शेख याला1200 रुपये काढून दिले. तेव्हा त्याने दर महिन्याला पैसे दिले नाही तर स्टॉल चालवू देणार नाही, अशी धमकी दिली. विविध गुन्हयांखाली तडीपार असलेले गुंड आपलया साथीदारांच्या माध्यमातून शहरात सक्रिय राहतात. लोकांना छळत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. या गुंडांवर व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना जरबी बसवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्याकडून सातत्याने केली जात आहे.

गुन्हेगारांवर  वचक हवा या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत. शकील आणि समीर शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांना येरवडा पोलिसांनी ऑगस्ट 2019 मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांनी एका महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचा नेकलेस जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्याकडून 5 चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी तडीपार केले होते. विविध गुन्हयांखाली तडीपार असलेले गुंड आपलया साथीदारांच्या माध्यमातून शहरात सक्रिय राहतात. लोकांना छळत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. या गुंडांवर व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना जरब बसवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्याकडून सातत्याने केली जात आहे.

नाना पटोलेंसह मलिकांविरोधात गावोगावी तक्रारी दाखल करा, चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आदेश

‘त्या’ गुंडाचा फोटो आणि माहिती प्रसिद्ध करा; भाजपचे नाना पटोलेंना खुले आव्हान

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें