AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : ‘हिंदीच बोलायचं, नाहीतर….’, एअरटेलच्या टीम लीडरला मनसेनं धु-धु धुतलं

Pune News : मराठी-हिंदी भाषा वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. ठाण्यात मुंब्रा येथील एक मराठी तरुण आणि फळ विक्रेत्याच्या वादाची घटना ताजी असताना आता पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ खट्याक आंदोलन केलय.

Pune News : 'हिंदीच बोलायचं, नाहीतर....', एअरटेलच्या टीम लीडरला मनसेनं धु-धु धुतलं
MNS Pune
| Updated on: Jan 04, 2025 | 7:47 AM
Share

फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून जमावाने मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. मुंब्र्यातील ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यानंतर पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चोप दिला आहे. पुणे वाकडेवाडी येथे एअरटेलच शो रुम आहे. तिथली ही घटना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमद नावाच्या टिम लीडरला बेदम चोप दिला. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं, मराठीत बोलले तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी या शाहबाज अहमदने दिली होती.

हिंदू सणांना सुट्टी न देणं तसच मागच्या तीन महिन्यांपासून मराठी मुलांचा पगारही केला नव्हता. त्यावर येथील कर्मचाऱ्यांनी आमचा पगार थांबवला म्हणून मनसेकडे तक्रार केली होती. “कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय?” अशी धमकी या शाहबाज अहमदने एअरटेल शो रुममध्ये काम करणाऱ्या मराठी मुलांना दिली होती.

तीन ऑफिसेस फोडण्याचा इशारा

या मराठी मुलांच्या अन्यायाला मनसे स्टाईलने वाचा फोडली. येत्या सोमवारपर्यंत पगार करा, अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.

मुंब्र्यात काय घडलं?

मुंब्र्यात राहणारा विशाल गवळी हा मुलगा बहिणीसाठी औषध घ्यायला बाहेर गेला होता. तिथून तो फळ घ्यायला गेला. फळ विक्रेत्याने 100 रुपये किलो भाव सांगितला. त्यावर त्याने 50 रुपयाला देणार का? म्हणून विचारणा केली. फळ विक्रेता हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो. त्यातून वाद सुरु झाला. पोलिसांनी उलट विशाल गवळीवर गुन्हा दाखल केला. “त्या मुलाला आणि त्याच्या आईला चार-चार तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं” असा आरोप ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. आता पुण्यातही मराठी बोलण्यावरुन अशाच प्रकारची घटना घडली आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.