AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण, लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

लसीचा साठा संपल्याने पुणे शहरात महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीत. तर दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत.

पुण्यात आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण, लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा
पुण्यात आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर आज लसीकरण होणार नाही.
| Updated on: May 25, 2021 | 11:10 AM
Share

पुणे : लसीचा साठा संपल्याने पुणे शहरात महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीत. तर दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत. मयूर कॉलनीमधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची लस घेण्यासाठी जवळपास दीड किलोमीटरपर्यत रांग लागलेली पाहायला मिळाली. (In Pune today only private hospitals Corona Vaccination)

आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु राहणार

पुण्यात आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर आज लसीकरण होणार नाही. लसीचा साठा संपल्याने आज सरकारी महापालिकेची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलधीर मोहोळ यांनी दिली आहे.

लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

महापालिकेची लसीकरण केंद्र हंद असल्याने आज पुणेकरांची पावलं खासगी रुग्णालयाकडे लस घेण्यासाठी वळाली. त्यासाठी पुण्याच्या विविध भागांतून नागरिकांनी विविध खाजगी रुग्णालयांबाहेर गर्दी केली होती. पुण्यातील मयूर कॉलनीमधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची लस घेण्यासाठी जवळपास दीड किलोमीटरपर्यत रांग केली होती.

लसीच्या तुटवड्यामुळे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची सूचना कालच पुणेकरांना देण्यात आली होती. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयाकडे वळवला. आज अगदी सकाळी विविध रुग्णालयांबाहेर पुणेकरांनी लसीकरणासारी मोठी गर्दी केली होती.

महापौर मोहोळ काय म्हणाले…?

लसीच्या तुटवड्यावर बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, “लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवार दि. 25 मे रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असून मनपास लस प्राप्त झाल्यावर पुढील लसीकरणाचं नियोजन जाहीर केले जाईल, पुणेकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी ”

(In Pune today only private hospitals Corona Vaccination)

हे ही वाचा :

Weather Updates: पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारु पार्टी! पुण्याच्या खेड तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.