एकापाठोपाठ एक मृतदेह, सोलापुरातल्या स्मशानभूमीत राखेचा खच, मन सुन्न करणारं चित्र!

मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर राख सावडण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे स्मशानभूमीत राखांचा आणि हाडांचा खच पडतोय. (Insufficient space for cremation in Solapur cemetery)

एकापाठोपाठ एक मृतदेह, सोलापुरातल्या स्मशानभूमीत राखेचा खच, मन सुन्न करणारं चित्र!
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीत दहन करण्यासाठी जागेची अडचण निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे फुटाफुटावर चिता जाळल्या जात आहेत
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 2:59 PM

सोलापूर : शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताहेत. परिणामी सरकारी हॉस्पिटल बरोबरच खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड्ची वाणवा भासू लागली असतानाच आता अंतिम संस्कारासाठी कोरोनाबाधित मृत देण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर राख सावडण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे तात्काळ दुसरे मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेत असल्यामुळे रुपाभवानी स्मशानभूमीत कोळसा राख आणि हाडांचा खच पडल्याचं पाहायला मिळत आहे. (Insufficient space for cremation in Solapur cemetery)

गेल्या दहा दिवसांपासून सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनामुळे दररोज वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू होत आहे. शहरातील कोरोना बाधित मृतदेहांवर रुपाभवानी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातात. कधीकधी ग्रामीण भागातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गाव दूर असेल तर त्याचाही अंतिम संस्कार सोपस्कार इथेच पार पाडले जातात. मात्र सध्या मृतदेहांची संख्या पाहिली तर स्मशानभूमीतील जागा अपुरी पडू लागल्याचं चित्र आहे.

अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी

रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी दोन मोठे शेड असून बाजूला तीन काटे आहेत. मात्र आता दिवसाला पंधरा ते वीस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे जागा अपुरी पडू लागली आहे.

Insufficient space for cremation in Solapur cemetery 2

दिवसाला पंधरा ते वीस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे जागा अपुरी पडू लागली आहे.

कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं

याआधी सोलापूर शहरात चार ते पाच देहावर अंत्यसंस्कार केले जायचे त्यावेळी जागेची इतकी अडचण भासत नव्हती मात्र आता मात्र कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीत दहन करण्यासाठी जागेची अडचण निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे दोन दोन फुटांवर चिता जाळल्या जात आहेत.

उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली!

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत 16 तारखेला 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(Insufficient space for cremation in Solapur cemetery)

हे ही वाचा :

Maharashtra Corona : उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली! एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत

Reality Check | स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.