AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले, थेट आमदारच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंनाही धक्का

शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.

एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले, थेट आमदारच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंनाही धक्का
eknath shinde
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 01, 2025 | 10:30 AM
Share

Eknath Shinde Shivsena: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे 232 आमदार निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली. परंतु माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा करिश्मा कायम दिसत आहे. त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत इतर अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारीही आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले आहे.

कोणी कोणी केला प्रवेश

शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. देवराम लांडे यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबू पाटे शिवसेना उबाठाचे नेते म्हणून जुन्नर तालुक्यात काम करत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार शरद सोनवणे, देवराम लांडे आणि बाबू पाटे यांनी प्रवेश केला. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली.

शरद सोनवणे यांच्यावर शिरुरची जबाबदारी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार यांच्या पक्षात गेले. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. शिवाजी आढळराव यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडली होती. त्यामुळे ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्या खांद्यावर दिली आहे.

शरद सोनवणे हे यापूर्वी शिवसेनेत होते. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुती असताना राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा त्यांना शिवसेनेत घेतले आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटात या भागात नेतृत्व नव्हते. त्यामुळे आढळराव पाटलांची उणीव शरद सोनवणे भरुन काढणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा…

कोकणात उद्धव सेनेला पुन्हा खिंडार, बड्या नेत्यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ