कोरोनाने पुन्हा हादरवलं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आजपासून कोरोना तपासणी

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेक पोस्ट सुरु करण्यात आले आहेत.

कोरोनाने पुन्हा हादरवलं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आजपासून कोरोना तपासणी
Karnataka check Post
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 2:14 PM

सागंली : महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन (Karnataka Government Posted Check Post On Border) कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेक पोस्ट सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट सुरु झाला आहे. तपासणी करुनचं महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे (Karnataka Government Posted Check Post On Border).

महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. कर्नाटक सरकारने आता त्यांच्या राज्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. यासाठी महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभे करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्हा लगतच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे.

त्यामुळे सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु झालेली आहे. या चेकपोस्टवर प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आणि मास्क तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना टेस्टची विचारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना नियम पाळण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करुनच कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.

Karnataka check Post

Karnataka check Post

महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं आहे. या राज्यांमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या सहाही राज्यांमध्ये 86.69 टक्के नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि केरळात एकूण 75. 87 टक्के सक्रिय रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचा दर 97.27 टक्के असून मृत्यू दर 1.42 टक्के आहे. देशात 1 लाख 43 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत (Karnataka Government Posted Check Post On Border).

Karnataka Government Posted Check Post On Border

संबंधित बातम्या:

बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण

वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक

मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.